मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात उद्या तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे. हा सामना मेलबर्नला होणार आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे.
या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने अंतिम 11 जणांचा संघ आज(17 जानेवारी) जाहिर केला आहे. या संघात ऍडम झम्पा आणि बिली स्टॅनलेकला संधी देण्यात आली आहे.
स्टॅनलेकला वेगवान गोलंदाज जेसन बेऱ्हेनडॉर्फच्या ऐवजी संधी देण्यात आली आहे. बेऱ्हेनडॉर्फ पाठीच्या दुखापतीमुळे या सान्यात खेळणार नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला 11 जणांच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी झम्पाला संघात संधी देण्यात आली आहे.
तसेच मेलबर्न रेनेगड्ससंघाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनलाही ज्यादाचा खेळाडू म्हणून संघात बोलवण्यात आले आहे.
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी जिंकला होता. तसेच दुसरा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.
मेलबर्न वनडेसाठी असा आहे 11 जणांचा ऑस्ट्रेलिया संघ –
ऍरॉन फिंच, ऍलेक्स कॅरे, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्डसन, पीटर सिडल, ऍडम झम्पा, बिली स्टॅनलेक.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतात परतल्यावर हार्दिक पंड्याने स्वत:ला घेतले एका रुममध्ये कोंडून
–डाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…
–दुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…