ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 281 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. एजबस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंड संघ 273 धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडचा एकही फलंदाज या डावात अर्धशतक करू शकला नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स आणि नेथन लायन यांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियापेक्षा 7 धावांनी आघाडीवर होता. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे प्रदर्शन आधिपेक्षा सुधारल्याचे दिसले. पॅट कमिन्स आणि नेथन लायन () यांच्या चार-चार विकेट्स इंग्लंडला कमी धावसंखेत गुंडळण्यासाठी महत्वाच्या ठरला. जोश हेजलवूड आणि स्कॉट बोलँड यांनीही प्रत्येक एक-एक विकेठ घेतली. इंग्लंडसाठी या डावात जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी सर्वोत्तम खेळी केली. दोघांच्याही विकेट्स लायनने प्रत्येकी 46-46 धावांवर घेतल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स () देखील यांचल्या लयीत दिसत होता. मात्र 43 धावा करून तो देखील पॅट कमिन्सची शिकार बनला.
ऑस्ट्रेलियाकडे सामना जिंकण्यासाठी चौथ्या दिवसातील शेवटचे संत्र आणि पाचवा दिवस संपूर्ण आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले, तर 281 धावांचे हे लक्ष्य गाठता येऊ शकते. पण इंग्लंडची अनुभवी जोडी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचे प्रदर्शन देखील निर्णायक ठरेल. पहिल्या डावात ब्रॉड आणि ओली रॉनिन्सन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या होत्या, तर अँडरसनला एकच विकेट मिळाली होती. (Australia need 281 runs to win the first Ashes Test of 2023)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्ड कप क्वॉलिफायर्स । यूएईवर भारी पडला एकटा हसरंगा, तब्बल 6 विकेट्स घेत केला वनडेत विक्रम
“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट