Loading...

‘या’ सामन्यासाठी टिम पेन नाही तर हा खेळाडू करणार ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व

ऑस्ट्रेलिया सध्या इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिका खेळत आहेत. त्यांचा अ‍ॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 4 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया संघ गुरुवार(29 ऑगस्ट) पासून डर्बीशायर विरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा ऑस्ट्रेलियाने विचार केला आहे.

ऑस्ट्रेलियाने या सराव सामन्यासाठी टिम पेन, डेव्हिड वॉर्नर, ट्रेविस हेड, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन लायन या 7 खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या 17 जणांच्या संघातील या 7 खेळाडूंना विश्रांती दिली असल्याने त्यांना या सराव सामन्यासाठी 1 खेळाडू कमी पडत आहे. त्यामुळे त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरेला या सराव सामन्यासाठी संधी दिली आहे.

त्याची अ‍ॅशेस मालिकेसाठी निवड झालेली नाही. त्याने 2019 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी केली होती.

तसेच ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पेनलाही विश्रांती दिली असल्याने वरच्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळेल.

Loading...

याचबरोबर या सामन्यातून स्टिव्ह स्मिथ चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यासाठी त्याचा फिटनेसही सिद्ध करेल. त्याला दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते.

त्याचबरोबर डर्बीशायर विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात मिशेल स्टार्क, पिटर सिडल, मायकेल नासिर आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्श वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळतील. तर अष्टपैलू क्रिकेटपटू मार्नस लॅब्यूशानेवर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल.

5 सामन्यांच्या या अ‍ॅशेस मालिकेत पहिल्या तीन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे तर दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. तसेच तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे.

डर्बीशायर विरुद्धच्या सराव सामन्यासाठी असा आहे 11 जणांचा ऑस्ट्रेलिया संघ – 

उस्मान ख्वाजा (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, अ‍ॅलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्यूशाने, मिशेल मार्श, मायकेल नासिर, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

दिनेश कार्तिक करणार ‘या’ संघाचे नेतृत्व

खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी टीव्ही जाहिरांतीची मदत घेत आहेत जम्मू-कश्मीर क्रिकेट बोर्ड

६० वर्षांची कारकिर्द, ७००० विकेट्स! ८५ व्या वर्षी या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

You might also like
Loading...