आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून नजीकच्या सामन्यात पराभव झाला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाला 5 धावांनी पराभूत केले. या सामन्यातील सर्वात चर्चेची गोष्ट ही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ज्याप्रकारे धावबाद झाली ती मानली जाते. त्या घटनेबाबत अनेक चर्चा होत असतानाच आता तिला धावबाद करणारी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक एलिसा हिलीनेच एक प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 173 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारताला संघर्ष करावा लागला. एकेवेळी असे वाटत होते की, संघाला विजय मिळेल, परंतु हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही धावबाद झाल्यामुळे आशा धुळीस मिळाल्या. हरमनप्रीत ज्याप्रकारे धावबाद झाली त्यावर खुद्द हिलीने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली,
“हरमनप्रीत स्वतःला कमनशिबी मानत असेल मात्र सत्य हेच आहे की ती वेळेत क्रिझमध्ये पोहोचली नाही. तिने थोडा आणखी जोर लावला असता आणि वेग दाखवला असता तर ती वेळेत पोहोचली असती. मोठ्या स्पर्धांमध्ये या अशा छोट्याशा मात्र महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष देण्याची गरज असते. तेव्हाच तुम्ही विजयी बनू शकता. आमचा संघ याबाबतीत वरचढ आहे.”
हरमनप्रीत भारतीय संघाच्या विजयासाठी 5 षटकात 40 धावांची गरज असताना दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होती. पहिली धाव घेतल्यानंतर ती काहीशी संथ झाली. ती दुसरी धाव पूर्ण करणार इतक्यात तिची बॅट मैदानावर अडकली. त्यामुळे ती धावबाद झाली. तिने 34 चेंडूवर 52 धावांची खेळी करताना 6 चौकार व 1 षटकार ठोकला. त्यानंतर इतर फलंदाजांना विजयी लक्ष गाठण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघाला पाच धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.
(Australia Wicketkeeper Alyssa Healy Slams Harmanpreet Kaur For His Slow Run In World Cup Semi Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे
मोठी बातमी! क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळला खेळाडू, उपचारापूर्वीच निधन, सहकाऱ्यांना धक्का