ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 31 वा सामना सोमवारी (दि. 31 ऑक्टोबर) ब्रिस्बेन येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने शानदार कामगिरी करत विश्वचषकातील दुसरा सामना 42 धावांनी आपल्या नावावर केला. या विजयात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही मोलाचे योगदान दिले. कर्णधार ऍरॉन फिंच याने पुन्हा एकदा संघासाठी उपयुक्त खेळी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तसेच, त्यांनी गुणतालिकेतील स्थानही मजबूत केले.
या सामन्यात आयर्लंड संघाचा कर्णधार एँडी बालबर्नी (Andy Balbirnie) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करताना खराब सुरुवात होऊनही निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंड संघाला सर्वबाद फक्त 137 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 42 धावांनी खिशात घातला.
Australia complete a fine win to keep semi-final hopes alive 💪#T20WorldCup | #AUSvIRE | 📝: https://t.co/glBzJZMISJ pic.twitter.com/21JDlSRg6q
— T20 World Cup (@T20WorldCup) October 31, 2022
आयर्लंड संघाकडून लॉर्कन टकर (Lorcan Tucker) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 48 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त गॅरेथ डेलॅनी (14), मार्क एडेर (11) आणि पॉल स्टर्लिंग (11) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. इतर एकाही फलंदाजांना 10 धावांचा आकडा पार करता आला नाही.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यात पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि ऍडम झम्पा या गोलंदाजांचा समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त मार्कस स्टॉयनिस यालाही 1 विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 44 चेंडूत 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने यादरम्यान 3 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त मार्कस स्टॉयनिस (35), मिचेल मार्श (28), टीम डेविड (नाबाद 15), आणि ग्लेन मॅक्सवेल (13) यांना दोन आकडी धावसंख्या करण्यात यश आले. यांच्याव्यतिरिक्त मॅथ्यू वेड (नाबाद 7) आणि डेविड वॉर्नर (3) यांना एकेरी धावांवर समाधान मानावे लागले.
यावेळी आयर्लंड संघाकडून गोलंदाजी करताना बॅरी मॅकार्थी याने सर्वाधिक विकेट्स चटकावल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जोश लिटल याने 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यानंतर 5 गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांचा नेट रनरेट -0.304 इतका आहे. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना 4 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध ऍडलेड येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय
कार्तिकची दुखापत गंभीर! बांगलादेशविरुद्ध पंत होणार प्लेईंग इलेव्हनमध्ये ‘इन’