Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ दोन कारणांमुळे दिल्लीतही ऑस्ट्रेलियाने गमावला सामना, चूक फलंदाजांचीच!

'या' दोन कारणांमुळे दिल्लीतही ऑस्ट्रेलियाने गमावला सामना, चूक फलंदाजांचीच!

February 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Pat-Cummins

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्धच्या सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाला 6 विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने संघाच्या दोन चुका दाखवून दिल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार दुसऱ्या कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने पराभवाच्या काही प्रमुख कारणांवर नजर टाकली. पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या मते ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकी गोलंदाजांविरोधात स्वीप आणि रिवर्स स्वीप खेळण्याच्या तयारीत नव्हते. पण तरीही त्यांनी असे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. उपकर्णधार स्टीव स्मिथ (Steve Smith) सह किमान चार-पाच खेळाडूंनी अशा पद्धतीने विकेट गमावल्याचे कमिन्स म्हणाला.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत कमिन्स म्हणाला, “माझ्या मते भारताने खरोखर चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करणे सोपे नव्हते, पण काही खेळाडू आपल्या खेळण्याच्या पद्धतीवरून भटकले.” कमिन्सने मान्य केले की अशा खेळप्टीवर सर्व फलंदाज एकाच पद्धतीने फलंदाजी करू शकत नाही. “प्रत्येक फलंदाजाची एक पद्धत असते. मला नाही वाटत की, कोणती एखादी पद्धत अशा परिस्थितीत सर्वांना फायद्याची ठरेल. दुर्दैवाने आमच्यातीक काहीजण क्रॉस बॅटिंगवाले शॉट खेळताना बाद झाले,” असे कमिन्स म्हणाला.

कमिन्सने पुढे बोलताना हेदेखील मान्य केले की, प्रथम फलंदाजीला आल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने किमान 300 धावा केल्या पाहिजे होत्या. याविषयी कमिन्स म्हणाला की, “मागे वळून पाहताना असे वाटते की याठिकाणी 300 धावा केल्या असत्या तर संघासाठी चांगले झाले अशते. संघाचे प्रदर्शन निराशाजनक होते. आण्ही नागपूरच्या दुसऱ्या डावाप्रमाणे खेळी केली. आम्ही या सामन्यात अधिक काळ भक्कम परिस्थितीत होतो. पण शेवटची जास्त धावा करू शकलो नाही.”

कमिन्सने पुढे भारतताच्या तळातील फलंदाजांचेही कौतुक केल. संघाला विजय मिळवून देण्यासाठी भारतीय संघाच्या तळातील फलंदाजांचे योगदान महत्वाचे होते, असे कमिन्सला वाटते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या जोडीने शेवटच्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा घाम काढला. तसेच दुसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या साथीने अक्षर पटेल याने संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचवले आणि ऑस्ट्रेलियाची आघाडी अवघ्या एका धावेवर आणून ठेवली. या दोन्ही सामन्यांमध्ये अक्षरने वैयक्तिक अर्धशतके ठोकली. उभय संघांतील तिसरा सामना 1 मार्चपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाईल. (Australian captain Pat Cummins explained the reason behind the defeat in the Delhi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सौराष्ट्रला रणजी चॅम्पियन बनवण्यानंतर मिळाले मोठी बक्षीस, वेगवान गोलंदाजाचे 10 वर्षांनी संघात पुनरागमन
पुजाराला ऑस्ट्रेलियन संघातर्फे 100 व्या कसोटीची ‘स्पेशल गिफ्ट’! खिलाडूवृत्तीने जिंकली मने


Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

"भारतीय संघ खूप नशीबवान आहे कारण...", राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य

Pat Cummins

लागोपाठ दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया संघात भूकंप, कर्णधार मायदेशी परतला, आता पुढे काय? वाचा सविस्तर

Photo Courtesy: Twitter/ ICC

केएल राहुलला सोडावे लागले उपकर्णधारपद, रोहितकडून 'या' तिघांपैकी एकाला मिळणार मोठी जबाबदारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143