कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन केले आणि गुरुवारी (28 डिसेंबर) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा 21 चेंडू शिल्लक असताना सहा विकेट्स राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावून 282 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 46.3 षटकांत 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
एलिसा हिली (Alyssa Healy) हीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर एलिसा हिलीने प्रचंड उत्साह व्यक्त केला. सामना संपल्यानंतर हीली म्हणाली, “तुम्ही कधी-कधी बाजूला होऊन चांगल्या खेळाडूंना त्यांचे काम करू द्यावे. सामन्यात दव उशिरा आला, पण मला वाटतं शेवटच्या 10 षटकांमध्ये गोलंदाजी करताना आम्ही कडक लाईन-लेन्थ ठेवायला हवी होती.”
ऑस्ट्रेलियन कर्णधार पुढे म्हणाली, “आमच्या फलंदाजीतील विचार खळबळजनक होता. आम्हाला मैदानावर अशाच फलंदाजीची ब्लू प्रिंट द्यायची होती. आमच्या फलंदाजांनी मैदानाच्या जवळ फटकेबाजी केली, त्याचा खूप फायदा झाला. मुली शानदारपणे पुनरागमन केले आणि आम्हाला कसे खेळायचे आहे हे दाखवून दिले.”
तर सामनावीर फोबी लिचफिल्ड (Phoebe Lichfield) म्हणाली, “हा पुरस्कार विशेष आहे. एकदिवसीय सामन्यात मी तिन्ही पुरस्कार जिंकले, जे विशेष आहे. सुरुवातीला पेरीने आपला खेळ केला आणि विकेटवर अनेक चांगले शॉट्स खेळले. मी सावकाश सुरुवात केली, पण ही भागीदारी छान झाली आहे. आम्ही आमचे अर्धशतक पूर्ण केले तेव्हा आमचा संघ चांगल्या स्थितीत होता. खेळपट्टी बऱ्यापैकी सपाट झाली होती. आम्हाला वाटलं तितका चेंडू फिरत नव्हता. मला माझ्या खेळावर थोडे अधिक काम करण्याची गरज आहे, तसेच 80 वर आऊट न होणे आवश्यक आहे.” (Australian captain’s biggest reaction after defeating Hermansene She said We thought)
हेही वाचा
AUS vs PAK: दुसऱ्या कसोटीत कांगारूंकडून पाकिस्तानची 79 धावांनी धुळधाण, मालिकाही घातली खिशात; कमिन्स ठरला हिरो
शमीची रिप्लेसमेंट मिळाली रे! दुसऱ्या कसोटीसाठी खुंखार गोलंदाज टीम इंडियात सामील, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा