Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

WTC फायनमधून वॉर्नरचा पत्ता कट झाला? ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी दिले उत्तर

WTC फायनमधून वॉर्नरचा पत्ता कट झाला? ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी दिले उत्तर

March 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
David-Warner

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर हाताच्या दुखापतीमुळे बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. दुखापतीच्या कारणास्तव वॉर्नर मायदेशात परतला होता. पण भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला पुन्हा संघात सामील केले गेले आहे. बॉर्डर गावसकर मालिका भारताने 2-1 अशा अंतराने जिंकली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. वॉर्नर या सामन्यासाठी उफस्थित राहणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ऑस्ट्रेलियाचे मख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅगडोनाल्ड यांनी याविषयी माहिती दिली.

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली. उभय संघांतील चौथा सामना अनिर्णित राहिला असला, तरी न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत केल्याचा फायदा भारताला मिळाला. श्रीलंकन संघ पराभूत झाल्याने भारताचे डब्ल्यूटीसच्या अंतिम सामन्यातील तिकिट पक्के झाले. दुखापतीमुळे डेविड वॉर्नर (David Warner) बॉर्डर गावसक कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात खेळला नाही. सोबतच त्याचे प्रदर्शन मागच्या मोठ्या काळापासून सुमार पाहायला मिळाले आहे. असात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापन वॉर्नरला बाहेरचा रस्ता दाखवणार, अशा चर्चा देखील मागच्या काही दिवसांपासून होत आल्या आहेत.

परंतु, ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅगडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी पुष्टी केली की, संघ व्यवस्थापन डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी वॉर्नरला विचारात घेणार आहे. मॅगडोनाल्ड म्हणाले, “सध्या वॉर्नर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी आमच्या रणनीतीचा भाग आहे.” भारताविरुद्धच्या वनडे मालिकेविषयी मॅगडोनाल्ड म्हणाले, “तो वनडे मालिकेसाठी संघात परत येत आहे. दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला आहे.” दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू होईल.

सोमवारी संपलेल्या अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा याला दुखापत झाल्याचे सांगितले गेले. ख्वाजाने पहिल्याडावात 180 धावांची ताबडतोड खेळी केली आणि दुसऱ्या डावात मात्र तो फलंदाजीला आला नाही. ख्वाजाची दुखापत जास्त गंभीर नसून डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याआधी त्याला विश्रांतीसाठी वेळ मिळाला आहे, असेही मॅगडोनाल्ड शेवटी म्हणाले.
(Australian coach informed that David Warner will play in WTC final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे एवढा पैसा..! ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 क्रिकेटपटू, भारतातील तिघांचा समावेश
‘माझी अंतराआत्मा सांगित आहे, आयपीएलमध्ये एका षटकात…’, युवा खेळाडू फूल कॉन्फिडन्समध्ये


Next Post
Chris-Gayle

दे घुमा के! 6,6,6...कतारमध्ये घोंगावलं ख्रिस गेल नावाचं वादळ, उभ्या-उभ्याच षटकारांची केली बरसात

Bangladesh

इंग्लंड क्रिकेटला धक्का । बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलग तिसरा पराभव

Indian-Cricket-Team

WTCच्या फायनलचं तिकीट तर मिळवलं, पण 'या' 3 आव्हानांचा सामना कसा करणार टीम इंडिया?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143