मेलबर्न | पूर्व-नियोजित वेळापत्रकानुसार पुढील वर्षी 18 ते 31 जानेवारी दरम्यान मेलबर्न पार्क येथे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खळाडूंना स्पर्धेपूर्वी हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.
ऑस्ट्रेलियन ओपनचे मुख्य कार्यकारी क्रेग टिले यांना 14 दिवसांच्या क्वारंटाईन नियमांमध्ये सूट हवी आहे. टिले यांनी गुरुवारी सांगितले की पूर्व-नियोजित वेळापत्रकानुसारच जानेवारी मध्ये मेलबर्नमध्ये ही स्पर्धा होईल याचा त्यांना विश्वास आहे. एटीपी चषक आणि ब्रिस्बेन, सिडनी आणि होबार्ट येथे होणाऱ्या स्पर्धाही वेळापत्रककानुसारच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते ऑस्ट्रेलिया असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
फ्रेंच ओपन सारखीच करावी व्यवस्था
नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन स्पर्धेसाठी ओपनसाठी खेळाडूंना सराव आणि खेळासाठी जैव-सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या प्रांतीय सरकारने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेसाठीही अशीच व्यवस्था करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कालावधीत खेळाडू सामान्य लोकांपासून अलिप्त राहतील.
सरावासाठी वेळ मिळेल कमी
हंगाम सुरू होण्यापूर्वी एखाद्या खेळाडूला दोन आठवडे हॉटेलमध्ये रहावे लागले ही बाब कोणत्याच खेळाडूला आवडणार नाही. तुम्ही खेळाडूंना दोन आठवडे क्वारंटाईन ठेवल्यानंतर स्पर्धेत सहभाग घेण्यास सांगितल्यास त्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळणार नाही. खेळाडूंना सरावासाठी वेळ न मिळाल्यास ते स्पर्धेत भाग घेणार नाहीत.
क्वारंटाईन सारखे वातावरण करावे निर्माण
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्यास सहमती दर्शविली आहे.
पुढे बोलताना टिले म्हणाले, “परदेशातून येणाऱ्या खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन राहावे लागेल ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. परंतु आम्हाला असे वाटते की या दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन सारखे वातावरण निर्माण करावे ज्यामध्ये खेळाडू कोर्टावर सराव करण्यास जाऊ शकेल आणि त्यानंतर थेट हॉटेलमध्ये परत येऊ शकेल.”
एटीपी चषक मेलबर्नमध्येच होण्याची शक्यता
“आम्हाला सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. जर प्रांतीय सीमा उघडल्या नाहीत तरच मेलबर्नमध्येच एटीपी चषक व अन्य स्पर्धा होण्याची शक्यता आहे.” असेही पुढे बोलताना टिले म्हणाले
महत्त्वाच्या बातम्या –
कोलोन टेनिस स्पर्धा: अँडी मरे पहिल्याच फेरीत पराभूत
St. Petersburg Open: स्टॅन वावरिंकाने दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट