सन २०१८ मध्ये चेंडू छेडछाडीच्या प्रकरणामुळे स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले होते. आणि पुन्हा कर्णधार होण्यासाठी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या एका युवा फलंदाजाने याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.
आम्ही एकत्र मिळून करतो काम
ऑस्ट्रेलिया संघाचा यष्टीरक्षक फलंदाज म्यॅथ्यू वेड म्हणाला की, “आमच्या संघात बरेच चांगले खेळाडू आहेत. भारताविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात माझ्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. आमच्या संघात मोझेस हेन्रीक्स आणि स्टीव्ह स्मिथ यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत, जे बिग बॅश लीगमध्ये संघाचे नेतृत्त्व करतात. आमच्याकडे काही अनुभवी खेळाडूही आहेत. आम्ही एकत्र मिळून काम करतो.”
स्मिथ पार पाडेल कर्णधारपदाची जबाबदारी
“मैदानात कुणीही एकटं पडत नाही. फिंच हा आमचा कर्णधार असून आम्ही एकत्र काम करतो. ऑस्ट्रेलियाचा दीर्घकाळ कर्णधार स्टीव्ह स्मिथ हाही आम्हाला सल्ला देतो. त्याला कर्णधारपद सोपवल्यास, तो ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडेल,” असेही पुढे बोलताना वेड म्हणाला.
“…कारकिर्दीची नव्याने सुरुवात झाल्यासारखं वाटत”
सन २०१७-२०१८ अॅशेस मालिकेपूर्वी वेडला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि टी20 संघातून वगळण्यात आले होते. पण २०१८-१९ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याची संघात निवड झाली. तो म्हणाला, “मी ३२ वर्षांचा आहे आणि बर्याच दिवसांपासून क्रिकेट खेळत आहे. मी गेल्या तीन वर्षांत पूर्णपणे बदललो आहे. कारकिर्दीची नव्याने सुरुवात झाली असं वाटतंय.”
भारतीय संघ अप्रतिम
टी20 मालिका गमावल्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही दोन टी20 सामने गमावता, तेव्हा कामगिरीचे परीक्षण करणे स्वाभाविक आहे. भारतीय संघ अप्रतिम आहे आणि त्यांचे खेळाडू नुकतेच आयपीएल खेळून आले आहेत. या प्रकारात त्यांचा चांगला सराव आहे. एका चांगल्या संघाकडून आम्हाला पराभव पत्करावा लागला.”
तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १२ धावांनी विजय
पहिल्या दोन टी२० सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत तिसऱ्या सामन्यात १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेलने महत्त्वाचे योगदान दिले. वेडने ८०, तर मॅक्सवेलने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. सोबतच गोलंदाजीत मिचेल स्वेप्सनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
संबधित बातम्या-
विराट किंवा राहुल नाही, तर या खेळाडूमुळे मी झालो रनआऊट; वेडने संघसहकाऱ्याला धरले जबाबदार
Aus vs Ind Live: नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा गोलंदाजीचा निर्णय: ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या खेळाडूचे पुनरागमन
INDvsAUS Live: ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा पुन्हा एकदा बिग शो; भारतासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान