इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१० एप्रिल) सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, चेन्नईचा अनुभवी सलामीवर फाफ डू प्लेसिसला खास कामगिरी करता आली नाही.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. चेन्नई संघाकडून सलामीला ऋतुराज गायकवाड आणि फाफ डी प्लेसिस उतरले. मात्र, या दोघांनाही फार काही खास करता आले नाही. डू प्लेसिस सामन्याच्या दुसऱ्याच षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर शुन्य धावेवर पायचीत झाला. फाफ डू प्लेसिसची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही ४ थी वेळ आहे.
यापूर्वी त्याला २०१४ साली भुवनेश्वर कुमारने, मिशेल जॉन्सनने शुन्यावर बाद केले होते. तर त्यानंतर २०२० च्या आयपीएल हंगामात त्याला संदीप शर्माने शुन्यावर बाद केले होते.
या सामन्यात फाफ डू प्लेसिस पाठोपाठ ऋतुराज गायकवाड देखील ५ धावा करुन बाद झाला. पण असे असले तरी चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा करता आला. त्यांच्याकडून सुरेश रैना याने ताबडतोड ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासोबतच मोईन अली याने ३६ तर रायुडूने २३ आणि जडेजाने २६ धावांची खेळी केली. यासोबतच करनने शेवटी येऊन ३४ धावांची आक्रमक खेळी केली.
दिल्लीचा विजय
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शॉ आणि शिखर धवन यांनी १३८ धावांची सलामी भागीदारी रचली. शिखर धवन याने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉ याने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यांच्या या भागीदारीनंतर रिषभ पंतने नाबाद १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी
मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश
कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत