आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत १७१ धावा उभारल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली मात्र सलग दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने त्याला एका अप्रतिम चेंडूवर बाद केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आवेशची अप्रतिम गोलंदाजी
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मागील दोन सामन्यात आरसीबीला वेगवान सुरुवात देणाऱ्या विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या गड्यासाठी ४ षटकात ३० धावा काढल्या. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराट एक धाव घेण्याच्या प्रयत्नात चेंडू थर्ड मॅनला टोलवू पाहत होता. मात्र, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्ट्यांवर आदळला. विशेष म्हणजे या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराटने हा फटका खेळत चौकार वसूल केला होता.
https://twitter.com/Naniricci45/status/1387054754627420163?s=19
BIG WICKET!#Kohli just played on! #Avesh strikes BIG!
Come on #DelhiCapitals 👏👏👏👏#DCvRCB #DCvsRCB#RCBvDC #RCBvsDC#IPL #IPL2021 pic.twitter.com/4eXmK8GvHM— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) April 27, 2021
आवेशने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत एक बळी मिळवला. तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आवेशाने हंगामातील पहिल्या सामन्यात एमएस धोनीला बाद करत सर्वांची वाहवा मिळवली होती.
डिव्हिलियर्सची तडाखेबंद फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांचे बळी लवकर गमावले. त्यानंतर, रजत पाटीदार व ग्लेन मॅक्सवेल यांनी थोडाफार डाव सावरला. एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा संघासाठी तारणहाराची भूमिका निभावत अखेरपर्यंत नाबाद राहून ४२ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या:
टी२० क्रिकेटमध्ये १२ धावांचा फटका असावा, दिग्गजाने केली मागणी
ब्रेट लीचेही पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल, भारताला केली तब्बल इतक्या रुपयांची मदत