इंग्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ मंगळवारपासून (२० जुलै) डरहॅम येथे काउंटी एकादश संघाविरुद्ध पहिला सराव सामना खेळत आहे. या सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी विश्रांती घेतली असून, अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. या सामन्यात काउंटी एकादशसाठी खेळत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे.
पहिल्या सराव सामन्याला झाली सुरुवात
इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघात दोन सराव सामने खेळणार आहे. त्यातील पहिला सामना चेस्टर ले स्ट्रीटच्या रिव्हर साईड मैदानावर सुरू झाला असून, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचा युवा अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर व या दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून गेलेला आवेश खान विरोधी काउंटी एकादश संघासाठी खेळत आहेत.
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विन त्यांनी या सामन्यातून विश्रांती घेतली आहे.
आवेशला झाली दुखापत
या सामन्यात काउंटी एकादशसाठी खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज आवेश खान याला क्षेत्ररक्षणा दरम्यान उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना लिहिले, ‘वेगवान गोलंदाज आवेश खान याच्या उजव्या अंगठ्याला पहिल्या सराव सामन्यात दुखापत झाली. त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले असून, बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.’
UPDATE – Fast bowler Avesh Khan sustained a blow to his left thumb on Day 1 of the warm-up game. He has gone to get a scan. The BCCI Medical Team is monitoring him.#TeamIndia pic.twitter.com/XZZOTK7iPP
— BCCI (@BCCI) July 20, 2021
आवेशने या सामन्यात काउंटी एकादशसाठी नवीन चेंडूंने गोलंदाजी केली होती.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून आला संघात
आवेश खान हा स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये चमकदार कामगिरी करून प्रकाशझोतात आला होता. २४ वर्षीय आवेशने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना ८ सामन्यात १४ बळी आपल्या नावे केले आहेत. त्यामध्ये एमएस धोनी, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस व रोहित शर्मा यांसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश होता. या कामगिरीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासह राखीव खेळाडू म्हणून पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय करायचे पुजाराच्या फॉर्मला? सराव सामन्यात नवख्या फिरकीपटू पुढे टाकल्या नांग्या, पाहा व्हिडिओ
फलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान