भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. भारतीय संघाला या सामन्यातील पहिल्या डावात ३४५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, अक्षर पटेलच्या गोलंदाजी समोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. त्याने ५ गडी बाद करत भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करून दिले होते. दरम्यान, तिसऱ्या (२७ नोव्हेंबर) दिवसाच्या समाप्ती नंतर अक्षर पटेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अक्षर पटेल याने आपल्या कारकिर्दीतील चौथ्या कसोटीत ५ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ६२ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यावेळी सामन्यानंतर ४०० गडी बाद करणारा आर अश्विन त्याच्याकडून सल्ला घेताना दिसून आला. त्यानंतर अक्षर पटेलने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अश्विनने म्हटले की, “मला एक गोष्ट खूप चांगली वाटली आणि तीच गोष्ट मला विसरायची आहे. रॉस टेलरसाठी ते क्षेत्ररक्षण सजवले होते, जिथे चेंडूने फिरकी घेतली होती. मी जेव्हा चेंडूला फिरवतो त्यावेळी तो बॅटचा संपर्क न होता निघून जातो, परंतु तू गोलंदाजी करत असताना त्याच चेंडूवर बॅटचा कडा लागतो. मला हेच शिकायचे आहे की, चेंडू बॅटचा कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लो मध्ये कसा जाईल.”
यावर प्रतिक्रीया देत अक्षर पटेल म्हणाला की, “तुम्ही चेंडूला खूप जास्त स्पिन करता, ज्यामुळे चेंडू बॅटचा कडा न घेता दूर निघून जातो. माझा चेंडू जास्त स्पिन होत नाही, ज्यामुळे तो बॅटचा कडा घेतो.”
Special: @ashwinravi99 takes centre stage to interview Mr. Fifer @akshar2026 & Super sub @KonaBharat. ????
You don't want to miss this rendezvous with the #TeamIndia trio after Day 3 of the Kanpur Test. ????- By @28anand
Full interview ???? ⬇️ #INDvNZ @Paytm https://t.co/KAycXfmiJG pic.twitter.com/jZcAmU41Nf
— BCCI (@BCCI) November 27, 2021
अक्षर पटेलने आपल्या कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २९६ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने या सामन्यात ४९ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍडलेड स्ट्रायकर्सला नमवत पर्थ स्कॉचर्स ठरला नवा महिला बिग बॅश ‘चॅम्पियन’ संघ
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार रद्द? क्रीडामंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान आले समोर
स्मिथला उपकर्णधार बनविल्याने दिग्गजाने व्यक्त केली नाराजी; दिले ‘हे’ कारण