---Advertisement---

मराठी बाणा..! शतक हुकलं तरी आयुष म्हात्रेने रचला इतिहास

On: रविवार, मे 4, 2025 12:19 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुष म्हात्रेने आरसीबीविरुद्ध मोठी कामगिरी केला आहे. आयपीएलमध्ये तो पहिले शतक झळकावू शकला नाही, पण या दरम्यान त्याने इतिहास रचला. आयुष म्हात्रे चेन्नईसाठी अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने केवळ 17 वर्षे 291 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. याशिवाय, आयुष आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे रियान पराग आणि वैभव सूर्यवंशी आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणाऱ्यांमध्ये वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याने या हंगामात 14 वर्षे 32 दिवसांच्या वयात गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतक झळकावून विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम रियान परागच्या नावावर होता, ज्याने 2019 मध्ये 17 वर्षे 175 दिवसांच्या वयात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. आता आयुष 17 वर्षे 291 दिवसांच्या वयात अर्धशतक करणारा तिसरा युवा खेळाडू ठरला आहे. याशिवाय, 2013 मध्ये संजू सॅमसनने 18 वर्षे 169 दिवसांच्या वयात आरसीबीविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

या यादीत पृथ्वी शॉचे नावही समाविष्ट आहे. पृथ्वीने 2018 मध्ये केकेआरविरुद्ध दिल्ली संघाकडून खेळताना 18 वर्षे 169 दिवसांच्या वयात हा पराक्रम केला होता. आतापर्यंत चेन्नईसाठी अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज सुरेश रैना होता. सुरेश रैनाने 2008 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याने 21 वर्षे 148 दिवसांच्या वयात सीएसकेसाठी अर्धशतक झळकावले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---