नवी दिल्ली | एकीकडे इंडियन प्रीमियर लीगमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय टी20 चषक सुरू असून तेथे गोलंदाजांची चांगलीच कसोटी लागत आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर) सिंध आणि नॉर्दन या संघादरम्यान सामना झाला. या सामन्यात सिंध संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आझम खान याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचीच मने जिंकले. या फलंदाजाने अवघ्या 43 चेंडूत 88 धावा फटकावून आपल्या संघाला 25 धावांनी विजय मिळवून दिला. आजम खान हा पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक मोईन खानचा मुलगा आहे आणि तो लांबलचक षटकार ठोकण्यासाठी ओळखला जातो.
आजम खानला मारला गुददा
या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानने आझम खानला गुददा मारला होता. वास्तविक, शादाब खान आझम खानचा मित्र आहे आणि सामन्यादरम्यान त्याने विनोद म्हणून त्याच्या छातीवर गुददा मारला. त्यावेळी आझम खूप संथ गतीने खेळत होता आणि त्याचा स्ट्राइक रेट 100 च्या जवळपास होता. मात्र, त्यानंतर आझमने आपला गिअर बदलला आणि पाहताच शादाब खानला तीन लांबलचक षटकार खेचले. यानंतर आझमने वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरलाही सोडले नाही. त्याने आमिरच्या चेंडूंवरही 3 षटकार लगावले. आझमने 8 षटकारांच्या मदतीने 88 धावा फटकावल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.
Electrifying 88 off 43 balls ! Well played Azam Khan 🔥🔥🔥
LIVE: https://t.co/q12O5Typhj
WATCH: https://t.co/f9MKWYinHO#NationalT20Cup | #HarHaalMainCricket | #NORvSIN pic.twitter.com/aaPb4eocLy— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2020
आझम खानची केली जाते चेष्टा
पाकिस्तानमध्ये अनेकदा आझम खानची चेष्टा केली जाते. त्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्याचे वजन जास्त आहे आणि म्हणून लठ्ठ असल्यामुळे बहुतेक वेळा त्याला ट्रोल केले जाते पण आझम एक प्रतिभावान खेळाडू आहे. षटकार लागवण्याची त्याची क्षमता अप्रतिम आहे. हेच कारण आहे की तो मोहम्मद आमिर, शादाब खान सारख्या चांगल्या गोलंदाजांनादेखील सहजपणे षटकार मारतो.
महत्त्वाच्या बातम्या –
महान फिरकीपटू मुरलीधरनचा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण
‘मला जाऊ द्या ना घरी’ लावणीवर विराटचा ठेका, पाहा जबरदस्त मीम्स
KXIP च्या फलंदाजांनी उडवला RCB च्या गोलंदाजांचा धुव्वा, ८ विकेट्सने साकारला विजय
ट्रेंडिंग लेख –
IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
काळा डाग! ‘आयपीएल’ इतिहासातील पाच घटना ज्यामुळे स्पर्धेची जगात बदनामी झाली
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर