पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी (१० एप्रिल) जोहान्सबर्ग येथे पार पडला. या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानने ४ गडी राखून यजमान दक्षिण आफ्रिकाला चितपत केले आणि टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मोठा विक्रम केला आहे.
सलामीला फलंदाजी करताना आझम जास्त विशेष खेळी करु शकला नाही. १४ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने त्याने अवघ्या १४ धावा केल्या. परंतु या छोटेखानी खेळीसह त्याने ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्दीतील ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
२०१२ ते २०२१ या कालावधीत १७१ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यातील १६५ डावात फलंदाजी करताना त्याने ६०१३ धावा चोपल्या आहेत. यासह ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावांचा आकडा पार करणारा तो पाकिस्तानचा पहिलाच आणि जगातील दुसराच फलंदाज ठरला आहे.
6⃣0️⃣0️⃣0️⃣ T20 RUNS
1⃣6⃣5⃣ INNINGS
???? Fastest ???????? batsman to achieve the 6000-run landmark
???? Second fastest to 6000 T20 runs in the world
Brilliant @babarazam258 ????#SAvPAK #HarHaalMainCricket #BackTheBoysInGreen pic.twitter.com/xu0FmJqclQ— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 10, 2021
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात ६ गड्यांच्या मोबलद्यात १८८ धावा केल्या. यात सलामीवीर ऍडेन मार्करम आणि कर्णधार हेन्रिच क्लासेन यांच्या अर्धशतकी खेळीचा वाटा होता. दरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नवाज आणि हसन अली यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकाच्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ७४ धावा केल्या. तसेच फहीम अशरफने ३० धावांचे योगदान देत १९.५ चेंडूत ६ गडी गमावत आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड
DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर
‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ