पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीमध्ये बाबर आझम वनडे क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला. आयसीसी वनडे क्रमवारीत प्रथम स्थान गाठणारा पाकिस्तानचा बाबर आझम चौथा फलंदाज आहे.
पहिल्या पाचमध्ये या फलंदाजांचा समावेश
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ वर्षीय बाबर आझमने ९४ चेंडूत ८२ धावा फटकावल्या. या खेळीमुळे त्याला १३ अंकाचा फायदा झाला. ८६५ गुणांसह भारतीय कर्णधार विराट कोहलीला ८ गुणांनी पछाडत प्रथम स्थानी पोहोचला. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा असून, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे न्यूझीलंडचा अनुभवी रॉस टेलर व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली दमदार कामगिरी
पाकिस्तानसाठी २०१० व २०१२ सालचे १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक गाजवल्यानंतर बाबरचा समावेश २०१५ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात केला गेला. काहीदिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी त्याच्या नावे ८३७ गुण होते. पहिल्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर तो अव्वलस्थानी गेला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात ३२ धावांची खेळी केल्याने त्याची घसरण झाली होती. परंतु, तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा दमदार खेळी करून त्याने पहिल्या स्थानावर अखेर कब्जा केला.
विराटचा मोडला विक्रम
विराट कोहली गेल्या १२५८ दिवसांपासून आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, आता अखेर विराट कोहलीला हटवून कर्णधार आझमने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर हक्क प्रस्थापित केला. यापूर्वी, झहीर अब्बास (१९८३-१९८४), जावेद मियांदाद (१९८८-१९८९) व मोहम्मद युसुफ (२००३) हे पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या पहिल्या स्थानावर पोहोचले होते. अशा परिस्थितीत बाबर आझम हा आयसीसीच्या फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत प्रथम स्थान गाठणारा पाकिस्तानचा चौथा फलंदाज बनला.
झमानची ही झेप
कसोटी क्रिकेटविषयी बोलायचे झाले तर बाबर आझम सर्वोत्तम चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून, सध्या तो सहाव्या क्रमांकावर आहे. टी२० मध्ये बाबरने तिसरे स्थान मिळविले आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत तो ११ व्या स्थानावर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सनरायझर्स हैदाराबादविरुद्ध देवदत्त पड्डीकल खेळणार का नाही? प्रशिक्षक माईक हेसनने दिले उत्तर
धक्कादायक! माजी कर्णधार हिथ स्ट्रिकवर आयसीसीने घातली तब्बल ८ वर्षांची बंदी, लावण्यात आले ‘हे’ ५ आरोप
गोलंदाजी करताना रोहितचा पाय मुरगळला अन् पत्नी रितीका काळजीने झाली अस्वस्थ, बघा तो क्षण