पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम मागील काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्या त्याची बॅट आग ओकत आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत अक्षरश: राडा केला आहे. त्याने क्वेटा ग्लेडिएटर्स संघाविरुद्ध वादळी शतक ठोकले आहे. त्याने 115 धावांची खेळी साकारत विक्रमांचे मनोरे रचले आहेत. त्याने या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच याची बरोबरी केली आहे. तसेच, भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही त्याने पछाडले आहे.
बाबर आझमचा कारनामा
पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धेतील 25वा सामना पेशावर जालमी विरुद्ध क्वेटा ग्लेडिएटर्स (Peshawar Zalmi vs Quetta Gladiators) संघात पार पडला. या सामन्यात बाबर आझम (Babar Azam) याने पेशावर जालमी संघाकडून खेळताना शतक ठोकले. त्याने मैदानाच्या प्रत्येक क्षेत्रात फटकेबाजी केली. त्याने यादरम्यान 65 चेंडूंचा सामना करताना 115 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 15 चौकार आणि 3 षटकारही मारले होते. त्याच्या खेळीच्या जोरावर पेशावर संघाने क्वेटा संघापुढे 241 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान क्वेटा संघाने 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. क्वेटाकडून जेसन रॉय (Jason Roy) याने सर्वाधिक 145 धावा चोपल्या.
The day belongs to Bobby Baadshah ????
Maiden HBL PSL Century for @babarazam258! #SabSitarayHumaray l #HBLPSL8 l #PZvQG pic.twitter.com/8Cf9YprLc3
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 8, 2023
या दिग्गजांची केली बरोबरी
पीसीएलमधील बाबरचे हे पहिलेच शतक आहे. दुसरीकडे, टी20 क्रिकेटमधील हे त्याचे एकूण 8वे शतक आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे डेविड वॉर्नर, ऍरॉन फिंच आणि मायकल क्लिंगर यांच्या नावावरही टी20 क्रिकेटमध्ये 8 शतकांचा समावेश आहे. तसेच, न्यूझीलंडच्या ल्यूक राईट आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनी टी20त 7 शतके मारली आहेत. भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी 6 शतके मारली आहेत. या यादीत अव्वलस्थानी ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणजेच ख्रिस गेल असून त्याची टी20 क्रिकेटमध्ये 22 शतके आहेत. (babar azam hit century in psl make record 8th hundred in t20 cricket see list)
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
22 शतके- ख्रिस गेल
8 शतके- बाबर आझम*
8 शतके- डेविड वॉर्नर
8 शतके- ऍरॉन फिंच
8 शतके- मायकल क्लिंगर
7 शतके- ल्यूक राईट
7 शतके- ब्रेंडन मॅक्युलम
6 शतके- केएल राहुल
6 शतके- विराट कोहली
6 शतके- रोहित शर्मा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video