---Advertisement---

लंका प्रीमियर लीगमध्येही बाबरचे शतक! गेलनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

---Advertisement---

श्रीलंकेत सध्या लंका प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम खेळला जात आहे. स्पर्धेतील दहावा सामना कोलंबो स्ट्रायकर्स विरुद्ध गाले टायटन्स यांच्या दरम्यान खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात कोलंबो स्ट्रायकर्स संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. 189 धावांचा पाठलाग करताना कोलंबो संघाचा प्रमुख फलंदाज बाबर आझम याने शतक झळकावले. यासह त्याने टी20 क्रिकेटमध्ये खास विक्रम केला.

पल्लेकल येथे झालेल्या या सामन्यात गाले संघाने प्रथम फलंदाजी करताना 188 धावा केल्या. संघासाठी न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट याने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. तर, डॅनियल व क्रॉसपुले यांनी अनुक्रमे 49 व 36 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलंबो संघासाठी पथुम निसंका व बाबर आझम यांनी 111 धावांची सलामी दिली. निसंकाने 54 धावा केल्या. अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 59 चेंडूमध्ये 190 धावांची खेळी केली. यामध्ये आठ चौकार व पाच षटकारांचा समावेश केला.

प्रथमच या स्पर्धेत खेळत असलेल्या बाबर याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात शतक करताना टी20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. टी20 मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या नावे आता 254 डावात 10 शतके जमा झाली आहेत.

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असून त्याने आतापर्यंत टी20 मध्ये 455 डाव खेळताना 22 शतके झळकावली आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी तब्बल चार फलंदाज दिसून येतात. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे मायकेल क्लींगर, डेव्हिड वॉर्नर, भारताचा विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार ऍरॉन फिंच यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी आठ शतके केली आहेत.

(Babar Azam Hits Century In Lanka Premier League 10th In T20)

महत्वाच्या बातम्या-  
BREAKING! न्यूझीलंडच्या दिग्गजाने जॉईन केली ऑरेंज आर्मी, हैदराबाद फ्रँचायझीकडून ब्रायन लारा करारमुक्त
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---