भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या दरम्यान सातत्याने तुलना होत असते. विराट आपल्या कारकिर्दीत बराच पुढे गेला असला तरी, बाबर हा त्याच्या अनेक विक्रमांचा पाठलाग करताना दिसतो. त्यामुळे अनेक वेळा चाहते व माजी खेळाडू त्यांची तुलना करतात. असे असताना आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होण्याआधी बाबर याने स्वतः आपण विराटकडून खूप काही शिकण्याचे कबूल केले.
आशिया चषकाआधी बाबरने प्रसारण वाहिनीसाठी एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील अनेक खुलासे केले. या मुलाखतीत ज्यावेळी त्याला विराट कोहली विषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला,
“मी कोहलीकडून खूप काही शिकलो आहे .कोहलीसारखा मोठा खेळाडू तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतो, ती गोष्ट खूप आत्मविश्वास देते. 2019 मध्ये जेव्हा मी विराट कोहलीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला फलंदाजीबाबत काही प्रश्न विचारले होते. फलंदाजी करताना आपला माईंडसेट कसा असावा, याबाबत बोलताना त्याने अत्यंत खोलात जाऊन तपशीलवार मला माहिती दिली होती. तो एक महान फलंदाज आहे.”
बाबर याने आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात शानदार शतक ठोकले. पाकिस्तान संघ संकटात असताना त्याने 151 धावांची खेळी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आता 2 सप्टेंबर रोजी सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर बाबर आणि विराट यांच्यावर असेल. हे दोन्ही संघ सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भेटू शकतात. तसेच दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यास एकाच स्पर्धेत तिसऱ्यांदा ते भेटण्याची शक्यता आहे. आगामी वनडे विश्वचषकात 15 ऑक्टोबर रोजी या दोन्ही संघांचा सामना होईल.
(Babar Azam Said I Learned Lot From Virat Kohli)
महत्वाच्या बातम्या-
तुफानी अर्धशतकाचे टीम डेव्हिडला बक्षिस! ऑस्ट्रेलिया निवडसमितीचा मोठा निर्णय
दुखापतग्रस्त असलेल्या खेळाडूंबाबत श्रीलंकन कर्णधाराचे वक्तव्य, म्हणाला आम्हच्याकडे युव खेळाडू…