पुणे। टेनिस क्रिकेटमध्ये बुधवारी(१७ फेब्रुवारी) एक धक्कादायक घडना घडल्याचे समोर येत आहे. जुन्नर तालुक्यातील जाधववाडी येथे टेनिस क्रिकेटचा सामना खेळत असताना एका क्रिकेटपटूचे मैदानावर हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. जुन्नर तालुक्यात स्वर्गीय मयुर चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरु असताना ही घटना घडली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
या स्पर्धेत ओझर विरुद्ध जांबुत हा सामना सुरु असताना बाबू नलावडे या ४७ वर्षीय खेळाडूला हृदयविकाराचा झटका झाला. तो ओझर संघाकडून खेळत होता. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो नॉनस्ट्रायकर एन्डला होता. यावेळी गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज असताना बाबू नलावडे खाली बसला आणि अचानक खाली कोसळला. त्यानंतर लगेचच अन्य खेळाडू त्याच्या जवळ आले.
त्याला झटका आल्यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याचे निधन झाल्याचे निदान झाले.
फलंदाजी करताना मैदानावरच आला हार्ट अटॅक… पुणे जिल्ह्यातील स्थानिक क्रिकेटपटूचा उपचारापुर्वीच मृत्यू… अंगावर काटा आणणारा व्हायरल व्हिडिओ… pic.twitter.com/fHuvTSygrb
— Pranali Kodre (@Pranali_k18) February 17, 2021
कशी काळाची चाहूल आली
बाग सुखाची करपुन गेली 💐💐💐
आज स्व मयुर चषक जाधववाडी स्पर्धेत मैदानावर अतिशय दुःखद घटना घडली ओझर व जांबुत हा सामना चालू असताना ओझर संघाचा टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू
बाबु नलावडे वय वर्ष ४७ हा फलंदाजी करत असताना अचानक मैदानावर हृदय विकाराचा तीव्र pic.twitter.com/ct4ajd0Xkf— शिवजन्मभूमिपुत्र_जुन्नरकर (@BeingRavi07) February 17, 2021
बाबू नलावडे हा टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत क्रिकेटपटू होता. त्यामुळे त्याच्या निधनाने सध्या जुन्नर तालुक्यात तसेच टेनिस क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विशेष लेख: खरंच गेल्या १३ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी पंतला ‘ही’ गोष्ट करावी लागेल, दिग्गजाने दिला सल्ला
आयपीएल लिलाव: ‘हे’ पाच परदेशी खेळाडू बनू शकतात करोडपती, एक तर होतोय प्रथमच सहभागी