पुणे। द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत माजी राज्यस्तरीय स्पर्धेतील स्नूकर विजेता हसन बदामी, मानव पांचाळ, शिवम अरोरा, माजी वरिष्ठ राज्यातील अव्वल मानांकित खेळाडू शाहबाज खान या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित मुंबईच्या हसन बदामीने पुण्याच्या अभिषेक बोराचा 5-2(04-41, 27-38, 32-22, 63-21, 38-16, 44-04, 32-07) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. पुण्याच्या शिवम अरोरा याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत आपला शहर सहकारी माधव जोशीयाचा 5-0(47-00, 44-24, 40-00, 41-15, 46-17) असा एकतर्फी पराभव केला. उपांत्य फेरीत शिवम अरोरा समोर अव्वल मानांकित हसन बदामीचे आव्हान असणार आहे.
दुसऱ्या मानांकित मुंबईच्या मानव पांचाळने संकेत मुथाला 5-1(12-42, 47-00, 39-29, 61-05, 58(58)-00, 34-18) असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. मुंबईच्या शाहबाज खानने पुण्याच्या तहा खानचे आव्हान 5-2(33-14, 32-27, 24-26, 40-33, 54-10, 27-35, 42-11) असे मोडीत काढत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत शाहबाज खानचा सामना दुसऱ्या मानांकित मानव पांचाळ याच्याशी असणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
उपांत्यपूर्व फेरी:
शिवम अरोरा(पुणे)वि.वि.माधव जोशी(पुणे)5-0(47-00, 44-24, 40-00, 41-15, 46-17);
हसन बदामी(मुंबई)वि.वि.अभिषेक बोरा(पुणे) 5-2(04-41, 27-38, 32-22, 63-21, 38-16, 44-04, 32-07);
मानव पांचाळ(मुंबई)वि.वि.संकेत मुथा(मुंबई) 5-1(12-42, 47-00, 39-29, 61-05, 58(58)-00, 34-18);
शाहबाज खान(मुंबई)वि.वि.तहा खान(पुणे) 5-2(33-14, 32-27, 24-26, 40-33, 54-10, 27-35, 42-11);
बाद फेरी:
तहा खान(पुणे)वि.वि.रोहन कोठारी(पुणे) 5-3(08-41, 38-27, 00-(53)53, 36-04, 65-22, 40-00, 23-35, 44-04);
अभिषेक बोरा(पुणे)वि.वि.राजीव शर्मा(मुंबई) 5-0(57-26, 48-20, 40-19, 35-08, 47-36);
माधव जोशी(पुणे)वि.वि.रोहन साकळकर(पुणे) 5-1(14-51, 52-05, 32-27, 37-16, 46-04, 40-37);
हसन बदामी(मुंबई)वि.वि.अजिंक्य येलवे(मुंबई) 5-0(47-29, 39-00, 64-12, 44-12, 41-22);
संकेत मुथा(मुंबई)वि.वि.रयान राझमी(मुंबई) 5-3(30-18, 52-00, 49-18, 00-44, 39-42, 06-35, 45-01, 45-19);
मानव पांचाळ(मुंबई)वि.वि.आश्विन पळणीतकर(पुणे) 5-1(36-18, 61-17, 01-30, 35-15, 41-05, 38-03).