महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League 2025) पहिल्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कर्णधार स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सला (GG) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दोन्ही संघातील हा सामना कोतंबी स्टेडियम वडोदरावरती रंगला आहे.
गुजरात जायंट्सची कर्णधार अॅशले गार्डनर म्हणाली की, पहिल्या सामन्यात त्यांच्याकडून 5 खेळाडू पदार्पण करतील. आरसीबी हा गतविजेता आहे, परंतु गुजरातला 2025च्या WPL मध्ये गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11-
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: स्म्रीती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.
गुजरात जायंट्स संघ: लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी, दयालन हेमलता, अॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर का पडला? माजी दिग्गजाने सांगितलं खरं कारण
चॅम्पियन्य ट्राॅफीमध्ये भारतीय संघात निवड न झाल्याने संतापला ‘हा’ खेळाडू! म्हणाला…
महाराष्ट्र केसरी ठरले पदकाचे मानकरी, हर्षवर्धन, अमृताला कास्यपदक