जगातील पहिली क्रिकेट टीम, जी देणार आपला अर्धा पगार कोरोना बाधितांना

जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. त्यामुळे अनेक जण कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठीही पुढे आले आहेत. यात बांगलादेश क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. बांगलादेशचे क्रिकेटपटू त्यांचे महिन्याचे अर्धे वेतन कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे सुपुर्त करणार आहे.

ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कराराच्या यादीत असलेल्या १७ खेळाडूंसह एकूण २७ खेळाडू वेतन दान करणार आहेत. हे अन्य १० खेळाडूही बांगलादेश संघाकडून खेळले आहेत.

संयुक्त निवेदनात क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की ‘संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारा विरूद्ध लढा देत आहे. बांगलादेशमध्येही या आजाराचा धोका वाढत आहे. आम्ही क्रिकेटपटू या साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक पावले उचलायला सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.’

‘आम्ही २७ क्रिकेटपटू आमच्या महिन्याचे अर्धे वेतन कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी देत आहोत. कर वगळल्यानंतर ही रक्कम अंदाजे 25 लाख बांगलादेशी टाका असेल. कदाचित, कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी हा निधी जितका आवश्यक आहे तितका नाही. परंतु जर एकत्रितपणे योगदान देऊ शकत असाल तर मग कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यामध्ये हे एक मोठे पाऊल असू शकते.’

बांगलादेशमध्ये आत्तापर्यंत ३९ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

ट्रेडिंग घडामोडी – 

टीम इंडिया जिथं १२ सामने खेळली ते मैदान आता होणार कोरोना बाधितांसाठी आयसोलशन सेंटर

कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळताना टिच्चून फलंदाजी करणारे ५ फलंदाज

You might also like