लंडन। 2019 विश्वचषकात रविवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशने 21 धावांनी विजय मिळवला आहे आणि या स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. याबरोबरच त्यांनी हा सामना जिंकत एक खास विक्रमही केला आहे.
बांगलादेश विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा पराभूत करणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. याआधी बांगलादेशने 2007 विश्वचषकातही दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. विश्वचषकात बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 4 सामने झाले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत.
तसेच आशियाई संघांपैकी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ एक विजय मिळवता आले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषकामध्ये आत्तापर्यंत 4 सामने झाले आहेत. यातील 1 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर 3 सामन्यात पराभव पत्करला आहे.
त्याचबरोबर विश्वचषकात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघही 4 वेळा आमने – सामने आले आहेत. यामध्येही पाकिस्तानने 1 विजय तर दक्षिण आफ्रिकेने 3 विजय मिळवले आहेत. तसेच श्रीलंका संघाचा विश्वचषकात 5 वेळा दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला आहे. यामध्ये श्रीलंकेला 1 विजय आणि 3 पराभव स्विकारावे लागले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच बांगलादेशने विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंड आणि स्कॉटलँड संघालाही दोन वेळा पराभूत केले आहे.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा थोडक्यात आढावा –
रविवारी पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 330 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन(75) आणि मुशफिकूर रहीमने(78) अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
गोलंदाजीत दक्षिण आफ्रिका संघाकडून इम्रान ताहिर, अँडील फेहलूक्वायो आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
त्यानंतर 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात 8 बाद 309 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक 62 धावांची अर्धशतकी खेळी केली.
बांगलादेशकडून गोलंदाजीत मुस्तफिजूर रेहमानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सैफुद्दीनने 2, तर मेहदी हसन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारे आशियाई संघ –
2 वेळा – बांगलादेश
1 वेळा – भारत
1 वेळा – पाकिस्तान
1 वेळा – श्रीलंका
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: सुलतान ऑफ स्विंग – वसीम अक्रम
–दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामनावीर ठरलेल्या शाकिब अल हसनने केला खास विश्वविक्रम
–विश्वचषक २०१९: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही आहे सर्वात आनंदाची बातमी