निर्णायक टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

नागपूर। आज(१० नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात तिसरा आणि निर्णायक टी२० सामना(3rd T20I) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर(Vidarbha Cricket Association Stadium) होणार आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने १ बदल केला आहे. भारताने अंतिम ११ जणांच्या संघातून कृणाल पंड्याला(Krunal Pandya) वगळले असून त्याच्याऐवजी मनिष पांडेला(Manish Pandey) संधी दिली आहे.

तसेच बांगलादेशने आज मोहम्मद मिथूनला(Mohammad Mithun) अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. त्याला मोस्सदक हुसेन(Mosaddek Hossain) ऐवजी संधी देण्यात आली आहे. हुसेन दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे.

३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील हा निर्णायक सामना असणार आहे. याआधी झालेल्या पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी एक-एक विजय मिळवल्याने मालिकेत बरोबरी झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयी होणारा संघ मालिकेतही विजय मिळवेल.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, खलील अहमद

बांगलादेश – लिटन दास, मोहम्मद नाईम, सौम्य सरकार, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमूदुल्लाह (कर्णधार), आफिफ हुसेन, मोहम्मद मिथुन, अमीनुल इस्लाम, शफीउल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, अल-अमीन हुसेन.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.