बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाकामध्ये खेळला जात आहे. यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या कामगिरीवरून चुकल्याचे दिसले. यजमान संघाचा पहिला डाव 227 धावांवरच संपुष्टात आला. यामुळे भारताला पहिल्या डावात उत्तम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, मात्र दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि शुबमन गिल एका पाठोपाठ बाद झाले. ज्यामुळे पुढे भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
केएल राहुल 45 चेंडूत 10 धावा आणि शुबमन गिल 39 चेंडूत 20 धावा करत विकेट गमावून बसले. या दोघांनाही तैजुल इस्लाम याने पायचीत केले. गिलने त्याच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार मारला. गिल बाद झाल्याने भारताची अवस्था 15.1 षटकात 38 धावसंख्येवर 2 बाद अशी झाली. खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली उपस्थित आहेत.
गिलने मागील कसोटीत शतकी खेळी केली होती, आता तो लवकर बाद झाल्याने पुजारा-कोहली यांची जबाबदारी वाढणार आहे. या दोघांनाही आता खेळपट्टीवर टिकून खेळावे लागणार आहे. पुजारानेही मागील कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी केली होती. तेव्हा त्याने 1400 पेक्षा अधिक दिवसांनी आंतरराष्ट्रीय कसोटीत शतक केले होते. कोहलीचा फॉर्म पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे, कारण मागील सामन्यात तो एकही अर्धशतकी खेळी करू शकला नव्हता.
राहुलने मागील सामन्यात भारताचे नेतृत्व उत्तम केले, मात्र एक फलंदाज म्हणून तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्याने मागील सामन्यात 22 आणि 23 अशा निराशाजनक धावा केल्या होत्या. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हाताच्या दुखापतीमुळे या कसोटी मालिकेला मुकला आहे.
Another one for Taijul Islam as Shubman Gill departs for 20 😯#WTC23 | #BANvIND | 📝: https://t.co/lyiPy1msJi pic.twitter.com/l0y5ud8YCe
— ICC (@ICC) December 23, 2022
पहिल्या कसोटतही तैजुल भारताचा काळ ठरला होता. त्याने भारताच्या पहिल्या डावात गिल, पुजारा, कोहली आणि कुलदीप यादव या विकेट्स घेतल्या होत्या. तो सामना भारताच्या गोलंदाजांनी गाजवला आणि भारत 188 धावांनी जिंकला.
या सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावात भारताकडून उमेश यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!
वाढदिवस विशेष: वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घेतली होती आंतरराष्ट्रीय निवृत्ती, क्रिकेटर हरविंदर सिंग