वेस्ट इंडीजमधील सर्वोत्तम फ्रॅंचाईजी टी२० क्रिकेट लीग असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) आणखी एक संघ इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आणखी एका फ्रॅंचाईजीने विकत घेतला आहे. वेस्ट इंडीजचा प्रमुख अष्टपैलू जेसन होल्डर नेतृत्व करत असलेला दोन वेळचा सीपीएल विजेता बार्बाडोस ट्रायडंट संघ आता बार्बाडोस रॉयल्स या नावाने ओळखला जाईल. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे मालक असलेल्या मनोज बदाले यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
आता बार्बाडोस ट्रायडंट नव्हेतर बार्बाडोस रॉयल्स
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची मालकी असलेल्या रॉयल्स स्पोर्ट ग्रुपचे (इमर्जिंग मीडिया) चेअरमन मनोज बदाले यांनी बार्बाडोस ट्रायडंट संघात गुंतवणूक केल्याचे जाहीर केले. बदाले म्हणाले, “मनिष पटेल (बार्बाडोस संघाचे मूळ मालक) यांच्याशी हा करार करताना आम्हाला आनंद होत आहेत. सीपीएलमधील बार्बाडोस फ्रॅंचाईजीमध्ये आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे. आता हा संघ नव्याने बार्बाडोस रॉयल्स नावाने ओळखला जाईल.”
बार्बाडोस रॉयल्स संघाचे संचालन राजस्थान रॉयल्सचे संचालन करणारा श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा हाच करेल. या नव्या संघांच्या लोगोचे देखील अनावरण केले गेले आहे.
अशी आहे बार्बाडोस संघाची कामगिरी
बार्बाडोस फ्रॅंचाईजीने आतापर्यंत दोन वेळा सीपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. २०१४ मध्ये कायरन पोलार्डच्या नेतृत्वात तर, २०१९ मध्ये जेसन होल्डरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली गेलेली. सध्या होल्डरच संघाचा कर्णधार असून ख्रिस मॉरिस, शाई होप व मोहम्मद आमिर यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू संघाचा भाग आहेत. सीपीएलचा नवा हंगाम ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल.
या संघानी केली आहे सीपीएलमध्ये गुंतवणूक
राजस्थान रॉयल्सपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) व पंजाब किंग्स यांनी सीपीएलमध्ये गुंतवणूक केली आहे. केकेआरने २०१५ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो संघामध्ये गुंतवणूक केली होती व तेव्हापासून हा संघ त्रिबॅंगो नाईट रायडर्स या नावाने ओळखला जातो. तर, पंजाब किंग्स संघाच्या मालकांचे सेंट लुसिया झुक्स या संघात काही समभाग आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौरा गाजवत राहुल चाहरने ठोकली टी२० विश्वचषकासाठी दावेदारी, ‘या’ अनुभवीचे स्थान धोक्यात!
पाक गोलंदाजाच्या चेंडूचा मानेवर जबरदस्त रपाटा अन् विंडीजच्या फलंदाजाची दुर्दशा, अखेर सोडलं मैदान
अंतिम टी२० सामन्यानंतर शनाका अन् संघाने घेतली कर्णधार धवनची भेट, ‘या’ विषयावर झालं बोलणं