आयपीएल २०२१ हंगाम येत्या ९ एप्रिल पासून सुरु होत आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गतवर्षी कोरोनामुळे आयपीएल २०२० स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. परंतु, यंदा आयपीएल २०२१ हंगामाचे आयोजन भारतातच करण्यात आले आहे. या स्पर्धेत यंदाही चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.
तसेच आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या सर्व १३ हंगामात अनेक फलंदाज होऊन गेले, ज्यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज.
३. ख्रिस गेल – वेस्ट इंडिज संघाचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या आक्रमक फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगमापासूनच, गेलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. गेलने आयपीएल २०१२ मध्ये झालेल्या हंगामात दिल्ली संघाविरुद्ध खेळताना अवघ्या ६२ चेंडूत १२८ धावांची खेळी केली होती. यात त्याने तब्बल १३ षटकार आणि ४ चौकार लगावले होते.
तसेच त्याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना किंग्ज इलेव्हेन पंजाब या संघाविरुद्ध १२ षटकार लगावत ११७ धावा केल्या होत्या. त्यामुळे या आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत गेलचे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही आहे. चौथ्या क्रमांकावर त्याच्यासह संयुक्तरित्या एबी डिविलियर्स आहे. डिविलियर्सने गुजरात लायन्स संघाविरुद्ध खेळताना १२९ धावांची खेळी केली होती. यात त्याने १२ षटकार लगावले होते.
२. ब्रेंडन मॅक्यूलम – या यादीत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलम आहे. मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध १५८ धावांची खेळी केली होती. यात त्याने १३ षटकार लगावले होते.
१. ख्रिस गेल – ख्रिस गेलच या यादीत अव्वल क्रमांकावर देखील आहे. गेलने २०१३ मध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पुणे वॉरियर्स इंडिया यांच्यात झालेल्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी खेळी केली होती. त्याने ६६ चेंडूमध्ये १७५ धावांची खेळी केली होती. यात त्याने १७ षटकार लगावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: पडीक्कलच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूला मिळू शकते आरसीबी संघाकडून पदार्पणाची संधी
आयपीएल २०२१: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू सीएसकेविरुद्धच्या सामन्याला मुकणार
वाह! क्रिकेटवरील चर्चेसाठी ‘द वॉल’ राहुल द्रविडला ‘या’ देशातून आले आमंत्रण