वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या विसडन चषक कसोटी मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यातील आजच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. ब्रॉडने आज कसोटी कारकिर्दीतील ५००वी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट त्याची ५००वी विकेट ठरला.
अशी कामगिरी करणारा तो जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला.
१३वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने १४०व्या कसोटीत हा टप्पा पार केला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांत तो जेम्स अँडरसननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
कसोटी कारकिर्दीत ५०० विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडने तब्बल १२ डेविड वॉर्नरला, ११ वेळा मायकेल क्लार्कला तर एबी डिविलियर्स व रॉस टेलरला प्रत्येकी १० वेळा कसोटीत बाद केले आहे.
भारतीय फलंदाजांत अजिंक्य रहाणे व भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला ब्रॉडने प्रत्येकी ६ वेळा बाद केले आहे.
५०० विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडने कसोटीत या फलंदाजांना केले सर्वाधिक वेळा बाद
१२- डेविड वॉर्नर
११- मायकेल क्लार्क
१०- एबी डिविलियर्स, रॉस टेलर
८- हशिम अमला, ख्रिस रॉदर्स, स्टिवन स्मिथ, शेन वॉटसन
७- मिचेल जॉन्सन
६- अझर अली, एमएस धोनी, ब्रॅड हॅडिन, टीम लेथम, ब्रेंडन मॅक्क्युलम, अजिंक्य रहाणे, युनिस खान, किमार रोच