गेल्या काही वर्षांमध्ये टी-२० क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. यापूर्वी १५० किंवा १६० धावा विजय मिळवण्यासाठी सुरक्षित मानल्या जायच्या. परंतु आता २०० पेक्षा अधिक धावा केल्या तरीही शेवटच्या चेंडूपर्यंत अंदाज येत नाही की, कोणता संघ सामना जिंकेल? जगभरात अनेक मोठमोठ्या टी-२० लीग खेळवल्या जातात. ज्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. या लीगमधील सहभागी प्रत्येक संघात असे ३ ते ४ फलंदाज असतात, जे कुठल्याही क्रमांकावर येऊन सामन्याची स्थिती बदलू शकतात.
सध्या भारतीय संघाचे केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांसारखे दिग्गज आणि अनुभवी फलंदाज आयपीएलमध्येही धुमाकूळ घालताना दिसतात. तसेच या संघात दोन असेही खेळाडू आहेत, जे एकत्र १९ वर्षांखालील विश्वचषक संघात खेळले होते आणि सध्या वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आयपीएलमध्येही ते आपापल्या संघाचे मॅचविनर खेळाडू आहेत. परंतु त्यापैकी एक खेळाडू यशाच्या शिखरावर आहे. तर दुसऱ्या खेळाडूला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.
युवा खेळाडू, रिषभ पंत आणि इशान किशन हे दोघेही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दोघांमध्ये भरपूर साम्य आहे. दोघेही डाव्या हाताचे यष्टीरक्षक फलंदाज आहेत. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे अनेकदा चर्चा देखील रंगली आहे की, या दोघांमधून असा कुठला खेळाडू आहे, जो मॅच विनर खेळाडू ठरू शकतो?
रिषभ पंतची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी
रिषभ पंतने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण ७६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३५.२५ च्या सरासरीने २२९२ धावा केल्या आहेत. यामधे त्याने २०८ चौकार आणि १०७ षटकार लगावले आहे. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेत १४ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे.
इशान किशनची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी
इशान किशनने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण ५६ सामने खेळले आहेत. यात त्याला २७. ३२ च्या सरासरीने १२८४ धावा करण्यात यश आले आहे. यामध्ये त्याने १०३ चौकार आणि ६६ षटकार लगावले आहेत. यासोबतच त्याने आयपीएल स्पर्धेत ७ अर्धशतके झळकावली आहेत.
या दोघांची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पहिली तर, रिषभ पंत इशान किशनपेक्षा पुढे असल्याचे दिसून येत आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतने अनेकदा संघाला सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. याबरोबरच तो सध्या भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. त्यामुळे रिषभ पंत आणि इशान किशनमध्ये रिषभ पंत मॅचविनर खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही’ परदेशी टी२० स्पर्धा गाजवण्यास भारतीय महिला क्रिकेटपटू सज्ज, स्म्रीतीचाही समावेश
कोहली-डिविलियर्सप्रमाणे त्यांच्या लाडक्या लेकींमध्येही मैत्री, ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल असंच