fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडिओ : तडाखेबंद अर्शधतक झळकवल्यानंतर ‘हा’ खेळाडू झाला भावूक, सहकाऱ्याला मिठी मारत भावना केल्या व्यक्त

March 19, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा थरार सुरू आहेत. या 10 व्या हंगामातील 40 सामना मेलबर्न स्टार्स आणि एॅडलेड स्ट्राईकर्स या संघात पार पडला. या सामन्यात मेलबर्न स्टार्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. मेलबर्न स्टार्स संघाने 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या होत्या. त्यानंतर 180 धावांचा पाठलाग करायला आलेल्या एॅडलेड स्ट्राईकर्स हा संघ 14.2 षटकात सर्वबाद 68 धावांच करू शकला. त्यामुळे मेलबर्न स्टार्स संघाने हा सामना 111 धावांनी जिंकला.

या सामन्यात मेलबर्न स्टार्स संघाकडून आंद्रे फ्लेचर यांनी 49 चेंडूचा सामना करताना नाबाद 89 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो या विजयाचा खरा हीरो ठरला. त्याचबरोबर या सामन्यात एक भावनिक घटना घडली. मेलबर्न स्टार्स संघाचा जेव्हा डाव संपला. तेव्हा या डावात दमदार खेळी करणारा आंद्रे फ्लेचरने कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याला मिठी मारली आणि भावूक झाला.

आंद्रे फ्लेचर जेव्हा दमदार खेळी करून तंबूत गेला आणि ग्लेन मॅक्सवेल भेटला. त्याने ग्लेन मॅक्सवेल याला मिठी मारली आणि भावूक झाला. मॅक्सवेलने त्याची पाठ थोपटली. तेव्हा समालोचन करत असलेले माजी दिग्गज ब्रायन लारा सुद्धा हे दृश्य पाहून भावूक झाले. समालोचन करताना लारा म्हणाले, “आपण बघू शकता की आंद्रे फ्लेचरसाठी सर्व खेळाडू किती खुश आहेत. हे दृश्य खूप चांगले आहे.” त्यांनंतर हा सामना मेलबर्न स्टार्स संघाने 111 धावांनी जिंकला.

A special moment for the Spiceman at the @MCG 💚#TeamGreen pic.twitter.com/0VKFGioJ2S

— Melbourne Stars (@StarsBBL) January 15, 2021

त्यामुळे या सामन्याचा सामनावीर म्हणून आंद्रे फ्लेचरला गौरविण्यात आले त्यावेळी त्याला विचारण्यात आले की, तो का भावनिक झाला होता. यावर उत्तर देताना आंद्रे फ्लेचर म्हणाला,” कर्णधार मॅक्सवेल त्याच्या खेळीने खूप खूश झाला होता. मॅक्सवेलने सांगितले होते की, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. संपूर्ण संघाला मला आनंदी बघायचे आहे.” त्यांनंतर आंद्रे फ्लेचरने ब्रायन लारा यांचे सुद्धा आभार मानले. ज्यांनी या फलंदाजाला खराब फॉर्ममधून सावरताना  मदत केली होती.

या सामन्यात मेलबर्न संघाकडून एॅडम झंम्पा याने सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या. त्याने 3.2 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल आणि झहीर खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मॅक्सवेलने फलंदाजी करताना 28 चेंडूत 37 धावा केल्या.


Previous Post

SL vs ENG : जो रूटचे विक्रमी द्विशतक, पाहुण्या संघाची स्थिती मजबूत

Next Post

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर 'अशा' आल्या प्रतिक्रिया

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या 'या' दोन चुका

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे 'या' ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.