---Advertisement---

चार चेंडूवर ४ बळी!! विश्वास नाही बसणार पण हे घडलंय, BBLमध्ये ऑसी गोलंदाजाचा भन्नाट कारनामा

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 12:51 AM
Camron-boyce
---Advertisement---

बुधवारचा (१९ जानेवारी) दिवस बिग बॅश लीगच्या इतिहासातील खास दिवसांपैकी एक ठरला. यादिवशी मेलबर्न रेनेगड्स आणि सिडनी थंडर यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात सिडनी थंडरने एक धाव शिल्लक ठेऊन विजय मिळवला. परंतु मेलबर्न रेनेगड्सच्या कॅमरून बॉयस (cameron boyce) याने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली आणि दिवस स्वतःच्या नावावर केला. त्याने विरोधी संघाच्या चार फलंदाजांना चार चेंडूत तंबूचा रस्ता दाखवला आणि लीगमध्ये नव्या विक्रमाची नोंद देखील केली.

सिडनी थंडरच्या चार फलंदाजांना एकापाठोपाठ चेंडूवर बाद करत बॉयसने सर्वांचेच लक्ष स्वतःकडे आकर्षित केले. बिग बॅश लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने चार चेंडूत लागोपाठ चार विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी ही कामगिरी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने केली होती. मलिंगाने २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अशाच प्रकारे चार चेंडूत चार विकेट्स घेतल्या होत्या. आता बॉयस ही कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. तर बीबीएलच्या इतिहासातील बॉयस सातवा गोलंदाज ठरला आहे, ज्याने हॅट्रीक केली आहे.

व्हिडिओ पाहा- २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही

कॅमरून बॉयसने या सामन्यात एलेक्स हेल्स, जॉनसर सांगा, एलेक्स रॉस आणि डेनियल सॅम या चार खेळाडूंच्या विकेट्स एकापाठोपाठ घेतल्या. या विकेट्स त्याने लागोपाठ चेंडूवर घेतल्या असल्या, तरी हॅट्रीक पूर्ण करण्यासाठी त्याला दोन षटके टाकावी लागली आहेत.

सिडनी थंडरने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. त्यांच्या डावातील सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बॉयसने हेल्सची विकेट घेतली. त्यानंतर ९ व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवर जॉनसन सांगा, दुसऱ्या चेंडूवर एलेक्स रॉस, तर तिसऱ्या चेंडूवर डेनियल सॅमची विकेट घेतली. अशाप्रकारे त्याने लागोपाठ चेंडूवर स्वतःच्या चार विकेट्स पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम केला. सोशल मीडियावर बॉयसच्या या प्रदर्शनाची चर्चा होत आहे.

दरम्यान, बॉयसने या सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये २१ धावा खर्च करून एकूण पाच विकेट्स घेतल्या. सिडनी थंडरने सामन्यात प्रथम फलंदाजी करत ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. सिडनी संघासाठी उस्मान ख्वाचाने ५१ चेंडूत ७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मेलबर्न रेनेगड्सने २० षटकात १६९ धावा केल्या आणि एक धाव कमी पडल्यामुळे सामना गमावला. मेलबर्न संघाने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट गमावली. ऍरॉन फिंचने मेलबर्न संघासाठी सर्वाधिक ८२ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या –

भारतीय गोलंदाजांची पिसं काढत दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचं खणखणीत शतक, केला ‘हा’ खास पराक्रम

किंग कोहली इज बॅक..! सचिनचा ‘हा’ कुणी मोडेल असं वाटलंही नव्हतं पण विराटने आज मोडलाच

एटीके मोहन बागान दणक्यात पुनरागमनासाठी सज्ज; समोर केरला ब्लास्टर्सचे आव्हान!

व्हिडिओ पाहा –

https://youtu.be/bYAP5DUBhow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---