बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या मालिकेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
युवा क्रिकेटपटू प्रतिका रावल आणि तनुजा कंवर यांना प्रथमच भारतीय संघासाठी प्रथमच खेळण्याची संधी मिळणार आहे. शुक्रवारी प्रथमच त्यांचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू राघवी बिश्तचाही वेस्ट इंडिजविरुद्ध 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या महिला वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
कॅरेबियन संघाविरुद्ध भारतीय संघाचे सर्व टी20 सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. ज्या अनुक्रमे 15, 17 आणि 19 डिसेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. तर 22 ते 27 डिसेंबर दरम्यान वडोदरा येथे एकदिवसीय सामने खेळवले जातील.
उत्तराखंडमधील अष्टपैलू राघवीला नुकतेच ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघासाठी तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला 20 संघात सामील करण्यात आले, जिथे तिने वनडेमध्ये तीन अर्धशतके झळकावली.
🚨 NEWS 🚨
India’s squad for IDFC First Bank T20I & ODI series against West Indies announced.
All The Details 🔽 #TeamIndia | #INDvWI https://t.co/2Vf8Qbix76
— BCCI Women (@BCCIWomen) December 13, 2024
भारताचा टी20 संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, राघवी बिश्त, रेणुका सिंग ठाकूर, प्रिया मिश्रा, तितास मिश्रा, सायमा ठाकोर, मीनू मणी, राधा यादव.
भारताचा एकदिवसीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (डब्ल्यूके), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मीनू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर, रेणुका सिंह ठाकूर
हेही वाचा-
गाबा कसोटी ड्रॉ राहिली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचणार! कसं ते जाणून घ्या
IND vs AUS: शेवटच्या चार दिवसांच्या खेळाच्या वेळेत बदल, गाबा कसोटीबाबत मोठे अपडेट समोर
शोएब अख्तर बरळला, जसप्रीत बुमराहला दिला कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला