भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली असून त्याच्या अनुपस्थित कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्त्व करेल. तर कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला या सामन्यासाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
त्याचबरोबरच सलामीवीर रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी मयंक अगरवालला सलामीवीर म्हणून संघात जागा मिळाली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना देखील संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही विश्रांती देण्यात आली आहे.
कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुसऱ्या सामन्यासाठी संघात सहभागी होईल. हा सामना मुंबई येथे ३ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.
असा आहे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसीध कृष्णा
महत्त्वाच्या बातम्या-
ओ देस मेरे! सकाळी आयसीमधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी ‘त्याने’ देशासाठी खेळताना अर्धशतक ठोकले
ड्रमला लक्ष्य करून शिकला गोलंदाजी; कारकिर्दीत ९४९ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ खेळाडूने सचिनलाही फोडला घाम
सेमी फायनल गमावली, पण पाकिस्तानच्या रिझवानचा ‘भीमपराक्रम’; टी२०त एका वर्षात कुटल्या १००० धावा