भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा केला आहे. या दौऱ्यात भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला रोख बक्षीस देणार होते.
पण याबरोबरच मंगळवारी(22 जानेवारी) बीसीसीआयने वरिष्ठ निवड समीती सदस्यांना 20 लाखांचे पारितोषिक घोषित केले आहे.
याबद्दल बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘5 जणांच्या निवड समीती सदस्यांना बोनस म्हणून प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत.’
या समीतीमध्ये अध्यक्ष एमएसके प्रसादसह देवांग गांधी, जतीन परांजपे, गगन खोडा आणि संदीप सिंग यांचा समावेश आहे.
बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीचे(सीओए) अध्यक्ष विनोद राय यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या कसोटी आणि वनडे संघातील समोतोल योग्य ठेवल्याबद्दल निवड समीतीचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले, ‘भारतीय संघाने ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी केली त्याचे आम्हाला अभिमान वाटत आहे. त्यामुळे आम्ही याआधीच क्रिकेटपटूंना आणि सपोर्ट स्टाफला रोख बक्षीस जाहीर केले आहे आणि आता आम्ही निवड समीती सदस्यांनाही बक्षीस घोषित करत आहोत. निवड समीतीने समतोल भारतीय संघ निवडण्यात आणि संघ व्यवस्थापनासमोर खेळाडूंचे योग्य पर्याय ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.’
त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. तसेच सीओएच्या सदस्या डायना एडुलजी यांनीही भारतीय संघाचे तसेच भारताच्या ऑस्ट्रेलियातील विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या सर्वांचे कौतुक केले आहे. तसेच त्या म्हणाल्या विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका महत्त्वाची होती.
तसेच त्यांनी निवड समीतीचेही कौतुक केले आहे.
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे बीसीसीआय खेळाडूंना मॅच फि एवढीच रोख बक्षीस देणार आहे. अंतिम 11 जणांच्या संघात असणाऱ्या खेळाडूंना 15 लाख रुपये तर संघातील राखीव खेळाडूंना 7.5 लाख रुपये असे रोख बक्षीस मिळणार आहे.
त्याचबरोबर प्रशिक्षकांना 25 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. तर सपोर्ट स्टाफला प्रत्येक सामन्यात मिळणाऱ्या प्रोफशनल फी इतकीच रोख बक्षीस दिले जाणार आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आहे. तसेच त्यानंतर पार पडलेल्या वनडे मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच द्विपक्षीय वनडे मालिकाही जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावल्यानंतर कर्णधार कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया
–आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम
–या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार