---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये ‘गंभीर’ युगाला सुरुवात, चॅम्पियन खेळाडू बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच!

---Advertisement---

भारतीय संघानं 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. त्यानंतर आता गौतम गंभीर संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर गंभीरसोबतचा एक फोटो शेअर करून त्याचे स्वागत केले. त्याने लिहिले की, ‘मला खूप आनंद होत आहे की मी गौतम गंभीरचे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करत आहे. आधुनिक काळात क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी करून त्यात बदल जवळून पाहिले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गौतम हा आदर्श व्यक्ती आहे. टीम इंडियाबद्दलची त्याची स्पष्ट दृष्टी आणि त्याचा अफाट अनुभव त्याला ही रोमांचक आणि सर्वात मागणी असलेली कोचिंग भूमिका हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार करतो. या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी बीसीसीआयने त्याला पाठिंबा दिला आहे.

तसं पाहिल तर, गौतम गंभीरला राष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्याही संघाच्या कोचिंगचा अनुभव नाही. मात्र त्याची आयपीएलमधील कारकीर्द जबरदस्त आहे. आयपीएलमध्ये कोच म्हणून गंभीर यानं मोठं नाव कमावलं आहे. आयपीएल 2024 मध्ये गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआर संघानं आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.

त्यापूर्वी गंभीर 2022 आणि 2023 हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघानं दोन्ही वर्षी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये धडक मारली होती. महत्त्वाचं म्हणजे, 2024 आयपीएल हंगामापूर्वी गंभीरनं लखनऊची साथ सोडली आणि त्या हंगामात लखनऊचा संघ प्रथमच प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. यावरून गंभीरचं योगदान किती महत्त्वाचं होतं, हे लक्षात येतं.

गौतम गंभीरनं टीम इंडियाचा खेळाडू म्हणूनही मोठं नाव कमावलं आहे. तो 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. विशेष म्हणजे, या दोन्ही विश्वचषकातील अंतिम सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं 2024 पूर्वी 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. या दोन्ही हंगामात गंभीर संघाचा कर्णधार होता.

गौतम गंभीरनं भारतासाठी 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी20 सामने खेळले आहेत. त्यानं कसोटीत 4154, एकदिवसीयमध्ये 5238 आणि टी20 मध्ये 932 धावा ठोकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण 20 शतकं (11 एकदिवसीय + 9 कसोटी) आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी खूप भाग्यवान…”, रोहित शर्माची गुरु राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट
आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा, भारताच्या ‘या’ खेळाडूनं मारली बाजी
राहुल द्रविडला या आयपीएल संघाकडून मोठी ऑफर, ‘द वाॅल’ दिसणार नव्या भूमिकेत?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---