भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा लवकरच सुरू होत आहे. 4 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय संघ 30 नोव्हेंबर रोजी रवाना होईल. तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने( बीसीसीआय) एक आपत्कालीन बैठक बोलावली असून, यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार आहे. भारतीय संघाला नवीन कर्णधार मिळणार का याबाबत अंतिम निर्णय या बैठकीत होऊ शकतो.
भारतीय संघाला बांगलादेश दौऱ्यावर 2 कसोटी व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सर्व प्रमुख खेळाडू पुनरागमन करत आहेत. या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, वरिष्ठ खेळाडू व माजी कर्णधार विराट कोहली तसेच निवड समितीचे माजी सदस्य सहभागी होतील. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी या बैठकीचे निमंत्रक आहेत.
बीसीसीआयने या बैठकीसाठी काही प्रमुख मुद्दे चर्चेला घेतल्याचे सांगण्यात येतेय. टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर संघाचा कर्णधार बदलण्याची मागणी होत आहे. त्यामुळे टी20 संघाच्या कर्णधार पदावरून रोहित राजीनामा देऊ शकते. असे झाल्यास त्याच्या जागी हार्दिक पंड्या याला नवा कर्णधार करण्यात येईल. यासोबतच टी20 संघासाठी नवा मुख्य प्रशिक्षक नियुक्त करावा का? याबाबत देखील या बैठकीत चर्चा होऊ शकते.
भारतीय संघाच्या विश्वचषकातील पराभवानंतर संघ व्यवस्थापनात अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन वेगळे कर्णधार व दोन वेगळे प्रशिक्षक असावेत याबाबत अनेक भारतीय दिग्गजांचे देखील एकमत झाले होते.
(BCCI Called Emergency Meeting Before Departure To Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिलदार ऋतुराज! स्वतःचा सामनावीर पुरस्कार राजवर्धनला देत जिंकली सर्वांची मने
पाकिस्तानात खेळायचा एक रुपयाही घेणार नाही स्टोक्स! कारण वाचून कराल कौतुक