इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) २०२२ हंगामाला (IPL 2022) सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या फिटनेसच्या दृष्टीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे (guidelines regarding fitness of players) घोषित केली आहेत. यानुसार खेळाडूंच्या फिटनेसच्या देखरेखीसाठी स्वतंत्र डॉक्टर ( नेमला जाणार आहे.
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआने सांगितले आहे की, जर कोणता खेळाडू योग्य फिटनेसशिवाय कोणत्याही फ्रँचायझीमध्ये सामील झाला, तर आयपीएल गव्हर्निंग काउंसिक एका डॉक्टरची नियुक्ती करेल. त्यामुळे तो खेळाडू फ्रँचायझीची निर्धारित फिटनेस मानके पूर्ण करतो की नाही याबद्दल डॉक्टरांकडून चौकशी होईल.
बीसीसीआयने (BCCI) सांगितले आहे की, ‘हंगामाच्या सुरुवातीला किंवा नंतर कोणताही खेळाडू संघात सामील झाल्यानंतर कोणत्याही वादग्रस्त स्थितीपासून दूर राहण्यासाठी बोर्ड खेळाडूंचा फिटनेस पाहाण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांकडून तपासणी करून घेईल. तसेच डॉक्टरांचा निर्णय अंतिम असेल.’
याशिवाय असेही सांगितले आहे की, जर कोणत्याही संघाने डॉक्टरांची मागणी केली नाही, तर खेळाडूला फिट मानले जाईल.
खरंतर मागील काही हंगामांमध्ये असे दिसले होते की, खेळाडू फिट असल्याचे सांगून संघात सामील झाले आणि नंतर काही सामने खेळून दुखापतग्रस्त झाले. अशावेळी त्या खेळाडूला त्याचे मानधन संघांना द्यावे लागते. त्याचमुळे अशा समस्यांपासून सुटका होण्यासाठी बीसीसीआयने स्वतंत्र डॉक्टर नेमण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
दोन दिवस होणार आयपीएल लिलाव
आयपीएल २०२२ लिलाव (IPL Auction 2022) १२ आणि १३ फेब्रुवारी असा दोन दिवस बंगळुरू येथे पार पडणार आहे. या लिलावात एकूण ५९० खेळाडू सहभागी होती. त्यातील ३७० खेळाडू भारतीय असून २२० खेळाडू परदेशी आहेत.
तसेच आत्तापर्यंत १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंना संघात कायम केले आहे. त्याचबरोबर लिलावानंतर प्रत्येक फ्रांचायझीला आपला संघात जास्तीत जास्त २५ खेळाडूंनाच सामील करता येणार आहे. त्यामुळे आता लिलावात जास्तीत जास्त केवळ २१७ खेळाडूंवर बोली लागू शकते. यात जास्तीत जास्त ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावातील सर्वात रोमांचक नियम सायलेंट टाय ब्रेकर! जाणून घ्या त्याबद्दल
IPL 2022: केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकता लिलाव, कोणाकडे किती पैसे? जाणून घ्या सर्वकाही
अजिंक्य रहाणेचा आणखी एक सनसनाटी आरोप! वनडे कारकीर्दीविषयी म्हणाला…