भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)चे सचिव जय शाह यांनी आयपीएल 2021 च्या उद्घाटन सोहळ्यास भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेच्या प्रतिनीधींना उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषद आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचा भाग असणार आहेत. याबद्दल डीसीसीआय अध्यक्ष महंतेश जीके यांनी जय शाह यांचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले की, “जगातील सर्वात मोठ्या टी-20 स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आम्ही जय शाह यांचे आभारी आहोत. सुरुवातीपासूनच ते खूप उत्साही असून दिव्यांग क्रिकेटला सतत प्रोत्साहन देत आहेत. या उद्घाटन समारोहात दिव्यांग क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष महंतेश जीके, उपाध्यक्ष सुमित जैन, सरचिटणीस रवी चौहान, सेवानिवृत्त अभय प्रताप सिंह आणि खजिनदार जोन डेव्हिड हे या समारंभात भाग घेणार आहेत.
गेल्या आठवड्यात बीसीसीआय सचिव जय शाह यांनी बीसीसीआय संबंधित व्यक्ती तसेच या संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले होते.
एएनआयने जय शाह यांनी भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेला दिलेल्या पत्राबद्दल सांगितले की, आयपीएल लीग भारतात परत आल्यामुळे जय शाह खूप खूश आहेत. त्यांनी या संबंधित संस्थेचे अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती हवी आहे असे सांगितले आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे आयपीएल लीग युएईमध्ये घेण्यात आली होती.
Dr. Mahantesh GK, President, Mr. Sumit Jain, Vice President, Ravi Chauhan, Gen Secy, Sqn Ldr Abhai Pratap Singh Retd, Jt Secy and John David, Treasurer, DCCI are attending the IPL Opening Ceremony representing various forms of Differently Abled Cricket.#IPL2021 #bcci #dcci
— Wheelchair Cricket India Association (@wcia_official) April 8, 2021
आयपीएल 2021 चा पहिला सामना 9 एप्रिलला चेन्नई येथे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चेन्नई येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
MI आणि RCB आज येणार आमने सामने, कुठे व केव्हा होणार पहिला आयपीएल सामना; जाणून घ्या सर्वकाही
मुंबईकरांची खैर नाही! आरसीबीच्या मोठ्या गोलंदाजाने हार्दिक आणि पोलार्डला बाद करण्याची बनवलीय योजना