भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पत्रकार बोरिया मुजूमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यांच्यावर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये साहाने मुजूमदार (Boria Majumdar) यांच्यावर त्याला मुलाखतीसाठी धमकावल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर बीसीसीआयच्या (BCCI)३ सदस्यीय समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला धमकावण्याच्या प्रकरणात मुजूमदार यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता माध्यमांतील वृत्तानुसार बीसीसीआयने मुजूमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे अशी चर्चा आहे की, मुजूमदार यांना भारतातील स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच त्याला क्रिकेटपटूंना भेटण्याचीही परवानगी दिली जाणार नाही. तसेच बीसीसीआय मुजूमदार यांना ब्लॅकलिस्ट करण्यासाठी आयसीसीला पत्रही लिहिणार आहे.
नक्की हा वाद आहे तरी काय?
फेब्रुवारी महिन्यात कसोटी संघातून वगळल्यानंतर काही तासांनी साहाने (Wriddhiman Saha) ट्विटरवर पत्रकाराशी व्हॉट्सऍपवरील संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यासोबतच त्याने धमकी मिळाल्याचा आरोपही केला होता. त्याने लिहिले होते की, “भारतीय क्रिकेटमध्ये माझ्या सर्व योगदानानंतर… एका तथाकथित सन्माननीय पत्रकाराशी मला हा सामना करावा लागतो. पत्रकारिता कुठे गेलीये?”
साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले होते की, “माझी मुलाखत घेईन. तुम्हाला लोकशाही हवी असेल, तर मी तुमच्यावर दबाव आणणार नाही. त्याने केवळ एकच यष्टीरक्षक निवडला. सर्वोत्तम कोण आहे? तुम्ही ११ पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकणारे लोक निवडा. तुम्ही फोन केला नाही. मी तुमची यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मला हे नेहमी लक्षात राहील.”
After all of my contributions to Indian cricket..this is what I face from a so called “Respected” journalist! This is where the journalism has gone. pic.twitter.com/woVyq1sOZX
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) February 19, 2022
दरम्यान, साहाने हा खुलासा करताना पत्रकाराचे नाव सांगितले नव्हते. पण साहाच्या या खुलास्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यामुळे साहाने त्याला धमकावणारा पत्रकार मुजूमदार असल्याचे स्पष्ट केले होते.
बीसीसीआयने साहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि बीसीसीआय वरिष्ठ परिषद सदस्य प्रभतेज सिंग भाटिया यांच्या नावाचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
गुजरात टायटन्सच्या मॅच फिनिशर तेवतियाचा फॅन बनले महान फलंदाज गावसकर, म्हटले ‘आइस मॅन’
Video: हार्दिक पंड्याची विकेट घेताच धवनचा जोरदार जल्लोष, फ्लाईंग किस देत केले सेलिब्रेशन
Video: हार्दिक पंड्याची विकेट घेताच धवनचा जोरदार जल्लोष, फ्लाईंग किस देत केले सेलिब्रेशन