नवी दिल्ली। लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत देशभरात चीनविरुद्ध तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान चाहत्यांनी बीसीसीआयला आयपीएलचे शीर्षक प्रायोजक विवोशी करार तोडण्याची मागणी केली होती. यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजकांबरोबर झालेल्या कराराचा आढावा घेणार असल्याचे म्हटले होते.
यादरम्यान बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी स्पष्ट केले, की जर ‘करार रद्द करण्याच्या नियमा’मुळे आयपीएलचे शीर्षक प्रायोजक विवोला फायदा होत असेल, तर बीसीसीआय या चीनच्या मोबाईल कंपनीशी संबंध तोडण्याची शक्यता नाही.
असे असले तरीही आयपीएल संचालन परिषद चीनी कंपन्यांशी झालेल्या करारासंदर्भात बैठकीचा आढावा केव्हा घेईल, याचा खुलासा करण्यास बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नकार दिला. विशेष म्हणजे भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधादरम्यान भारत सरकारने चीनच्या टिक-टॉक (Tik- Tok) समवेत ५९ ऍपवर बंदी घातली आहे.
करार केव्हा रद्द होतील याबद्दल काही सांगितलेच नाही
आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत भाग घेणाऱ्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, “सध्या आम्हाला टी२० विश्वचषक आणि आशिया चषकाच्या परिस्थितीबद्दल काही माहित नाही, असे असेल तर आम्ही बैठक कशी काय घेऊ शकतो. होय, आम्ही प्रायोजकावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. परंतु आम्ही कधीच ‘रद्द’ किंवा ‘समाप्त’ यांसारख्या शब्दांचा वापरच केला नाही. आम्ही म्हटले, की आम्ही प्रायोजकांचा आढावा घेऊ.”
“आढाव्याचा अर्थ असा आहे की आम्ही कराराच्या सर्व पद्धतींचे परीक्षण करू. जर करार रद्द करण्याचा नियम विवोच्या बाजूने जास्त असेल, तर आम्ही दरवर्षी ४४० कोटी रुपयांच्या करारावरून माघार का घेतली पाहिजे? आम्ही तेव्हाच हा करार रद्द करू, जेव्हा ‘करार रद्द करण्याचा नियम’ आमच्या बाजूने असेल,” असे काही प्रश्न उपस्थित करत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे म्हटले.
२ आठवड्यानंतरही होऊ शकली नाही चीन कंपन्यांबरोबरच्या करारावर आढावा बैठक
बीसीसीआय आणि विवो (VIVO) यांमधील झालेला करार २०२२मध्ये संपणार आहे. यादरम्यान हेही स्पष्ट केले, की पेटीएम (ज्यामध्ये अलिबाबा एक गुंतवणूकदार आहे) किंवा ड्रीम इलेव्हन, बायजूस (BYJU’S) आणि स्विगी (SWIGGY) (यामध्ये चीनी व्हिडिओ गेम कंपनी टेन्सेंटची गुंतवणूक आहे) यांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण त्या भारतीय कंपन्या आहेत.
Taking note of the border skirmish that resulted in the martyrdom of our brave jawans, the IPL Governing Council has convened a meeting next week to review IPL’s various sponsorship deals ????????
— IndianPremierLeague (@IPL) June 19, 2020
आयपीएलच्या (IPL) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून १९ जूनला करारासंदर्भात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जवळपास २ आठवड्यानंतरही ही बैठक होऊ शकली नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एका छोट्याश्या खिळ्याने घेतला होता प्रतिभावान क्रिकेटपटूचा जीव
-१६व्या वर्षी कसोटी पदार्पण करत जबरदस्त करियर केलेले ३ क्रिकेटर
-एकाच दिवशी २ आंतरराष्ट्रीय सामन्यात २ अर्धशतके करणारा अवलिया