पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार आहेत. या सामन्यातील आशियाई एकादश संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 4 भारतीय खेळाडूंची नावे पाठवली आहेत.
यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांचा समावेश आहे.
या सामन्यांतील भारतीय खेळाडूंच्या समावेशाबद्दल माहिती असलेल्या एका सुत्राने आयएएनएसला सांगितले की बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे खेळाडूंची उपलब्धता तपासून त्यांची नावे पाठवली आहेत.
या सुत्राने सांगितले, ‘खेळाडूंची उपलब्धता तपासल्यानंतर गांगुलीने त्यांची नावे बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे पाठिवली आहेत. कोहली, शमी, धवन आणि कुलदीप हे चार खेळाडू आशियाई एकादश संघाचे प्रतिनिधित्व करतील. आम्ही ही नावे पाठवल्यानंतर बराच काळ झाला आहे. कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयकडून आशियाई संघ बनवण्यासाठी खेळाडूंची यादी आवश्यक होती.’
तसेच मागील काही कालावधीपासून भारत-पाकिस्तानमधील संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे या सामन्यात आशियाई एकादश संघाकडून पाकिस्तानचे खेळाडूही खेळणार का हा प्रश्न चर्चेत होता. पण बीसीसीआयचे सहसचिव जयेश जॉर्ज यांनी या सामन्यासाठी पाकिस्ताच्या खेळाडूंना आमंत्रण पाठवले नसल्याचे स्पष्ट केले होते.
ते म्हणाले होते की, आम्हाला जे कळले आहे ते म्हणजे आशियाई एकादश संघामध्ये कोणताही पाकिस्तानी खेळाडू असणार नाही. तसेच पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये व्यस्त असल्याने पाकिस्तानी खेळाडूंनी या सामन्यापासून स्वत: ला दूर ठेवले आहे.
आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघात होणाऱ्या टी20 सामन्यांचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त केले जात आहे. आयसीसीने त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला आहे. या 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 18 मार्च आणि दुसरा सामना 21 मार्चला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम (Sher-e-Bangla National), ढाका (Dhaka) येथे पार पडणार आहे.
असे असेल बांगलादेशमधील आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील टी20 सामन्यांचे वेळापत्रक-
18 मार्च – पहिला टी20 सामना – सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) – शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
21 मार्च – दुसरा टी20 सामना – सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) – शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
भारताविरुद्ध ४ विकेट्स घेत टीम साऊथीने केलाय मोठा पराक्रम!
वाचा????https://t.co/mVtTwJ74gf????#म #मराठी #Cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 22, 2020
६३ कसोटी खेळलेल्या रहाणेच्या नशीबात कधी अशी वेळ आली नव्हती
वाचा????https://t.co/h3jC7waRVx????#म #मराठी #Cricket #INDvsNZ #TeamIndia @ajinkyarahane88— Maha Sports (@Maha_Sports) February 22, 2020