शुक्रवार रोजी (२६ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना झाला. हा सामना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने गाजवला. मागील काही सामन्यांतील फ्लॉप शोमुळे राहुल टीकाकारांच्या निशाण्यावर होता. अशात या सामन्यात झुंजार शतक झळकावत त्याने टिकाकारांची बोलती बंद केली आहे. सध्या त्याचा शतक साजरा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करताना डावातील ३२ व्या षटकापर्यंत भारत ३ बाद १५८ धावा अशा स्थितीत होता. रोहित शर्मा, शिखऱ धवन, विराट कोहली यांसारखे फलंदाज बाद झाल्याने संघाची गाडी डगमगताना दिसत होती.
मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने धावांची शंभरी पार करत संघाला भक्कम आघाडी मिळवून देण्यात योगदान दिले. ११४ चेंडूंत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०८ धावा त्याने केल्या. अखेर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा गोलंदाज टॉम करनने त्याला पव्हेलियनला धाडले.
यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने राहुलचे शतक साजरे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हवेत बॅट उंचावत राहुल आपल्या शतकाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. दरम्यान त्याने आपल्या हातातील बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत कान पकडले.
https://www.instagram.com/p/CM4UJZZA3kq/?utm_source=ig_web_button_share_sheet
A century to cherish from @klrahul11 👌👌#TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/3N9PRxF1lW
— BCCI (@BCCI) March 26, 2021
दुसरीकडे डगआउटमध्ये बसलेले भारतीय खेळाडू आणि कर्मचारी त्याचे टाळ्यांच्या गजरात कौतुक करत होते. मैदानावर असलेल्या रिषभ पंतनेही आलिंगन घालत त्याची पाठ थोपटली. या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंतली दर्शवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या १५० चेंडूत ३५० धावा करणारा फलंदाज करतोय भारताविरुद्ध पदार्पण, जाणून घ्या त्याच्याविषयी
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न
इंग्लंडच्या पहिल्या स्थानाला धोका; ‘अशी’ कामगिरी केली तर भारतीय संघ अव्वल क्रमांकावर होणार विराजमान