क्रिकेटटॉप बातम्या

Asia Cup 2023 । भारताच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पंतची एन्ट्री, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेट संघ आगामी आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर सराव करत आहे. संघाचा ट्रेनिंग कॅम्प बेंगलोरच्या अलूर मैदानावर लावला गेला आहे. सोमवारी (28 ऑगस्ट) खेळाडू मैदानात सराव करत असताना त्याठिकाणी रिषभ पंत देखील आल्याचे पाहायला मिळाले. भारतीय कॅम्पमध्ये पंतचे पुनरागमन पाहून चाहत्यांनी हे फोटो चांगलेच व्हायरल केले.

रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज असला, तरी मागच्या काही वर्षांमध्ये त्याने संघातील आपले स्थान पक्के केले होते. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी पंतने केलेली वादळी खेळी विसरणे चाहत्यांना शक्य नाहीये. असे असले तरी, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंत भीषण कार अपघाताचा शिकार झाला. या अपघतात त्याची कार जळून खाक झाली, पण सुदैवाने यष्टीरक्षक फलंदाज आधीच गाडीतून बाहेर पडला होता. मात्र, त्याला झालेली गंभीर दुखापतीतून पंत अद्याप सावरला नाहीये.

सोमवारी भारतीय संघातील सर्व खेलाडून अलूरमध्ये आशिया चषकासाठी सराव करत होते. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, तर विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांचाही फलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत होता. अशातच रिषभ पंत () याने याठिकाणी उपस्थिती लावली. सोशल मीडियावर कॅम्पमधील पंतचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून चाहेत पंतच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करत असल्याचे दिसते.

दरम्यान, आघामी आशिया चषकाची सुरुवात बुधवारी (30 ऑगस्ट) होणार आहे. पहिला सामना जयमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान याठिकाणी खेळला जाईल. भारताला आशिया चषकातील आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबर रोजी खेळायचा आहे. आशिया चषकाचे जयमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, स्पर्धेतील अवघे चार सामने पाकिस्तानमध्ये, तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. (Before the Asia Cup, Rishabh Pant visited the Indian team’s training camp)

महत्वाच्या बातम्या – 
‘मला वाटले म्हणून काहीही करता येत नाही’, चहलसारख्या खेळाडूंचा प्रश्न विचारताच कर्णधार रोहित स्पष्ट उत्तर
‘भारतातील विश्वचषक भारताने जिंकावा…’, दिग्गज महिला खेलाडूची मोठी प्रतिक्रिया

Related Articles