वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (28 जानेवारी) खेळला गेला. यात बेलारूसच्या अरिना सबालेंकाने विजेतेपद पटकावले आहे. मेलबर्नमधील रॉड लेव्हर एरिना येथे अडीच तास चाललेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत सबालेंकाने कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिचा पराभव करून प्रथमच ग्रँडस्लॅम जिंकले.
New best friend ????@SabalenkaA • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/mETse087Jk
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2023
टेनिसविश्वातील मानाच्या चार ग्रँडस्लॅमपैकी पहिली ग्रँडस्लॅम असलेल्या असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी बेलारूसची अरिना सबालेंका व कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना यांच्या दरम्यान खेळली गेली. या दोन्ही खेळाडू प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत खेळत होत्या. रॉड लेव्हर एरिना येथे अडीच तास चाललेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत सबालेंकाने 4-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली रायबाकिना या सामन्यात विजयाची दावेदार होती. तिने पहिला सेट अपेक्षेप्रमाणे आपल्या नावे करत विजयाच्या दिशेने घौडदौड केली. मात्र, त्यानंतर सबालेंकाने जबरदस्त पुनरागमन करत स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली.
हे विजेतेपद सबालेंकासाठी अधिक खास आहे. कारण, तिला या स्पर्धेत आपल्या देशाचे नाव व ध्वज वापरण्याची बंदी होती. रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा दिल्यामुळे बेलारूस टेनिस संघटनेला निलंबित केले गेलेले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांनी त्यामुळे बेलारूसच्या खेळाडूंना देशाचे नाव न सांगण्याची अट घातली. त्यामुळे बेलारूसचे खेळाडू केवळ पांढऱ्या ध्वजासह स्पर्धेत उतरले होते.
(Belarus Aryna Sabalenka Won Australian Open 2023 Womens Singles)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दोन कर्णधारांची काही गरज नाही’, वरिष्ठ खेळाडूचे रोखठोक वक्तव्य; म्हणाला, “रोहितने विश्वचषकात…”
“उमरानला बाहेर बसवा”, दिग्गजाने दुसऱ्या सामन्यासाठी सुचविला महत्त्वाचा बदल; म्हणाला…