रशिया। फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत आज बेल्जियम आणि जपान आमने-सामने येत आहेत.
तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहचण्याच्या इराद्याने बेल्जियम मैदानात उतरणार आहे. त्यांनी २०१४ला ब्राझिलमध्ये झालेल्या स्पर्धेत सलग चार विजय मिळवले आहेत.
अनुभवी जपानचा बाद फेरीतील मार्गही बरा होता. त्यांचे आणि सेनेगलचे सारखेच गुण होते. मात्र सेनेगलपेक्षा जपानला दोन कमी यलो कार्ड मिळाल्याने फेअर फ्लेच्या आधारे बाद फेरीत प्रवेश निश्चित झाला.
बेल्जियमने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात त्यांनी पनामाला ३-०ने, ट्युनीशियाला ५-२ने आणि इंग्लंडला १-०ने पराभूत करून दिमाखात आपला बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला.
साखळी फेरीत जपानने सुरूवातीच्याच सामन्यात कोलंबियावर २-१ असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात त्यांना सेनेगल विरूद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. तर गटातील अंतिम सामन्यात पोलंडकडून ०-१ने पराभूत व्हावे लागले.
बेल्जियमचा हा १३वा तर जपानचा ६वा फिफा विश्वचषक आहे.
आतापर्यंत बाद फेरीतील सामन्यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये अर्जेंटिना, स्पेन, पोर्तुगल आणि क्रोएशिया या बलाढ्य संघांना पराभवाचा सामना करावा लागला. तर गतविजेता जर्मनी साखळी फेरीतच गारद झाला.
जपानचे इजी कावाशिमा, माकोटो हॅसेबे, युटो नागाटोमो आणि शिंजी ओकाझाकी हे खेळाडू फिफा विश्वचषकातील त्यांचा ११वा सामना खेळत आहे.
हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी या स्पर्धेत यलो कार्डनेच सुरूवात केली आहे. यासाठी बेल्जियमचे थॉमस मेयुनीर, केवीन डी ब्रुयने हे खेळाडू चिंतेचा विषय बनले आहेत. तर जपानच्या हॅसेबे, तोमोयकी ईयुइ, कावाशिमा ह्या खेळाडूंचीही अशीच अवस्था आहे.
तसेच फिफा क्रमवारीत बेल्जियम ३ऱ्या आणि जपान ६१व्या स्थानावर आहे.
मात्र या फिफा क्रमवारीचा खेळांडूवर काहीही फरक पडत नाही आहे. ते आपला उत्कृष्ठ खेळ खेळत आहे.
तर आजच्या सामन्यातही असेच काही बघायला मिळणार का हे नक्कीच पाहाण्यासारखे असेल.
महत्च्वाच्या बातम्या-
–भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई
–पराभूत झाल्यावर लगेच आंद्रेस इनिएस्ताचा आतंरराष्ट्रीय फु़टबॉलला रामराम