ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्ससाठी फलंदाजी करताना बेन मॅकडॉरमॅटने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. मॅकडरमॉटने सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करताना होबार्ट संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात होबार्ट संघाने १२१ धावांनी मोठा विजय आपल्या नावे केला.
या सामन्यात बेन मॅकडरमॉटने ६५ चेंडूंमध्ये १२७ धावा चोपल्या. त्याने या सामन्यात अत्यंत संथ सुरुवात केली. त्याने आपले अर्धशतक ३५ चेंडूमध्ये पूर्ण केले. मात्र, यानंतर त्याने मैदानावर वादळ आणले. मेलबर्नच्या सर्व गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने ५०-१०० हा टप्पा केवळ १८ चेंडूंमध्ये पूर्ण केला. त्याने एकूण ६५ चेंडू खेळताना १२७ धावा तडकावल्या. यामध्ये ९ चौकार व ९ षटकारांचा समावेश होता.
शतकासह रचला इतिहास
या सामन्यातील शतकासह बिग बॅश लीगमध्ये सलग दोन सामन्यात दोन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला. मॅकडरमॉटने २७ डिसेंबरला ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात ६० चेंडूत ११० धावा केल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत आपल्या बिग बॅश कारकिर्दीत तीन शतके ठोकली आहेत. मॅकडरमॉटने आतापर्यंत बीबीएलमध्ये (BBL) ६६ सामन्यांत ३८.३० च्या सरासरीने १९६५ धावा केल्या आहेत. त्याने ८ अर्धशतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना २ एकदिवसीय सामन्यात २८ धावा आणि १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३.६६ च्या सरासरीने १६४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Year Ending 2021 | ‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप ‘प्लेइंग इलेव्हन’ (mahasports.in)
‘या’ कारणामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पराभूत होऊनही आहे खुश, वाचा काय म्हणाला.. (mahasports.in)