पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर आता पाकिस्तान संघ कसोटीत विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे यजमानपद भूषवेल. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ पाकिस्तान येथे पोहोचला. पाकिस्तानमध्ये आगमन झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आपण या मालिकेत खेळण्यासाठी कोणतेही मानधन घेणार नसल्याचे सांगितले आहे.
या मालिकेतून मिळणारी संपूर्ण फी स्टोक्स दान करेल. त्याने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. त्याने लिहिले,
‘पाकिस्तानमध्ये ही ऐतिहासिक कसोटी मालिका खेळण्यासाठी येऊन खूप आनंद होत आहे. 17 वर्षानंतर आमचा संघ येथे कसोटी सामना खेळेल. यावर्षी पुरामुळे पाकिस्तानच्या बऱ्याच भागात प्रचंड नुकसान झाले आहे. हे अत्यंत दुर्दैवी वाटते वाटते. या खेळाने मला आयुष्यात खूप काही दिले आहे. मला वाटते की क्रिकेटच्या पलीकडे असलेले काहीतरी परत देण्याची ही योग्य वेळ आहे. कसोटी मालिकेसाठी मला मिळणारी माझी संपूर्ण मॅच फी पाकिस्तानच्या पूरग्रस्त लोकांना दान करेल. यामुळे पाकिस्तानातील पूरग्रस्त भागात काही प्रमाणात मदत मिळू शकेल, अशी आशा आहे.’
I’m donating my match fees from this Test series to the Pakistan Flood appeal ❤️🇵🇰 pic.twitter.com/BgvY0VQ2GG
— Ben Stokes (@benstokes38) November 28, 2022
इंग्लंड संघ प्रथमच स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड बाहेर खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघ कसा कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
उभय संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असलेल्या या मालिकेतील पहिला सामना 1 ते 5 डिसेंबर दरम्यान रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत मुलतान येथे होईल. तर, अखेरचा सामना 17 ते 21 डिसेंबर यादरम्यान कराची येथे खेळला जाईल.
(Ben Stokes Donate All His Match Fees To Pakistan Flood Victims)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफी: दमदार कामगिरीसह महाराष्ट्र उपांत्य फेरीत; अशा रंगणार सेमी-फायनलच्या लढती
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, जस क्रिकेट अकादमी संघांचा मोठा विजय